महात्मा गांधी विद्यालयात क्रांती दिवस व जागतिक आदिवासी दिवस साजरा
![]()

महात्मा गांधी विद्यालयात क्रांती दिवस व जागतिक आदिवासी दिवस साजरा भादली येथील महात्मा गांधी विद्यालयात क्रांती दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री के डी रडे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलं तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षक श्री पी बी गायकवाड हे होते प्रमुख वक्ते म्हणून उपशिक्षक श्री एस पी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना ऑगस्ट क्रांती दिना बद्दल क्रांतिकारकांची व ऑगस्ट क्रांती कशी झाली याबाबत माहिती सांगितली त्याचबरोबर त्यांनी भारतीय मूलनिवासी आदिवासी आहेत ते प्रामाणिक राहतात व जंगल जमीन यांची सेवा करतात आदिवासी दिनाची माहिती देखील त्यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री आर पी अत्तरदे यांनी केले रुपेश चौधरी यांनी भगतसिंगांची माहिती सांगितली योगेश्वरी कोळी येणे चले जाव आंदोलनाची माहिती दिली बालभवनच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची गीत सादर केली कार्यक्रमाचा आभार उपशिक्षिका सौ प्रज्ञा नारखेडे यांनी मांनले

