1 min read

गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेधार्थ बाभुळगावात कँडल मार्च रॅली

Loading

गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेधार्थ बाभुळगावात कँडल मार्च रॅली

बाभुळगाव एकवटले चिमुकली कल्याणीच्यां मारेकऱ्यास फाशी द्यावी.

प्रतिनिधी -पी.डी.पाटील

धरणगाव : नुकत्याच गोंडगाव ता. भडगाव येथील झालेल्या घटनेने संपर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट वाहत आहे. गोंडगाव येथील अवघ्या 8 वर्षाची चिमुकलीवर एका विकृत मनोवृत्तीचा नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. व तीन दिवस तिचा मृत देह चाऱ्याचा ढिगाऱ्यात लपवून ठेवला. ही घटना ही हृदय हेलावून टाकणारी आहे. अख्खा महाराष्ट्र या घटनेने सुन्न झालेला आहे. या अश्या विकृत वृत्तीच्या नराधमाला फाशी द्यावी या मागणीसाठी पूर्ण देश भरात या घटनेचा निषेधार्थ ठीक ठिकाणी बंद पाळण्यात येत असून शासनाला निवेदने ही दिली जात आहेत. या घटनेने जनतेत संतप्त भावना ह्या निर्माण झाल्या आहेत. चिमुकली कल्यानीच्या आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी देश भरात जोर धरत आहे.
धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी दिनांक ६ ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता श्री गजानन महाराज मंदिरा पासून कँडल मार्च रॅली काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या वेळी पूर्ण गावातील श्री पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून झालेल्या अमानवीय कृत्याचा जाहीर निषेध केला. चिमुकली कल्याणीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी व्हावी अशी मागणी सर्व जनतेतून होताना दिसत आहे. सर्व गावकऱ्यांनी कॅण्डल मार्च काढून चिमुकली कल्याणीला श्रध्दांजली वाहिली. कल्याणीच्या मारेकऱ्याला फाशी द्यावी व चिमुकली कल्याणी ला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *