1 min read

आमदार किशोर पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करा; मराठी पत्रकार संघाची मागणी

Loading

आमदार किशोर पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करा; मराठी पत्रकार संघाची मागणी

शिवसेना शिंदे गटाचे पाचोऱ्यातील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. किशोर पाटील पत्रकाराला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या मुलीच्या कुटुंबीयांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली होती. पण, यावरून एका पत्रकाराने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याचं सांगितलं जात आहे. याच प्रकरणावरून किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी पाचोर्‍यातील आमदार किशोर पाटील यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज करण्यात आली.

पत्रकार हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा वारसदार मानला जातो. लोकशाही व्यवस्था सुदृढ ठेवण्यात प्रसार माध्यमांची भुमिका महत्वाची ठरते. पत्रकार समाजाचा आरसा आणि जागृक पहारेकरी असे असतांना पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी एका जागृक पत्रकारास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधीने पत्रकाराशी असे वागणे म्हणजे लोकशाहीचा व माध्यमांचा अपमान करणारे आहे. म्हणून मराठी पत्रकार संघातर्फे आमदार किशोर पाटील यांचा तीव्र निषेध करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *