1 min read

महसूल सप्ताह निमित्ताने पोलीस पाटलांचा सन्मान!
भिवंडीतून साईनाथ पाटील व सोमनाथ ठाकरे यांचा जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान….

Loading

महसूल सप्ताह निमित्ताने पोलीस पाटलांचा सन्मान!
भिवंडीतून साईनाथ पाटील व सोमनाथ ठाकरे यांचा जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान….
सैनिकहो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम महसूल सप्ताहातील शिरोबिंदू-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे,दि.७ (मनिलाल शिंपी):- महसूल सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा झाला सन्मान यामध्ये भिवंडी तालुक्यातील श्री.साईनाथ वामन पाटील, श्री.सोमनाथ बाळाराम ठाकरे.
ठाणे- सिद्धार्थ रामचंद्र गायकवाड, बाळाराम राजाराम पाटील,
मीरा-भाईंदर- मेलविन पावलू अंद्रात, श्री.नेल्सन पेद्रु मुनिस
कल्याण- अशोक नामदेव म्हात्रे, अनिता गोरख राजगुरू
अंबरनाथ- जयवंत परशुराम पाटील, सुफियान अब्दुल वहाब बुबेरे,
कल्याण- प्रल्हाद शंकर पाटील, विलास पांडुरंग हरळू
शहापूर- मुकुंद वामन भडांगे, एकनाथ बुधाजी विशे.
मुरबाड- अनंता वामन वाघ, सतीश त्रिंबक देशमुख, राजाराम हरिश्चंद्र टोहके रवींद्र धोंडू भोईर यांना ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, कारण पोलीस पाटील देखील शासनाचे काम गाव पातलीवर करत असतात त्यामुळे त्यांचा सन्मान होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळेच महसूल सप्ताह निमित्ताने त्यांचा सन्मान करण्यात आला,
तसेच हा कार्यक्रम”सैनिकहो तुमच्यासाठी” हा विशेष महसूल सप्ताहातील शिरोबिंदूच ठरला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकताच झालेल्या कार्यक्रमात कल्याण येथे केले.
महसूल सप्ताहांतर्गत कल्याण येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे “सैनिकहो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कल्याण प्रांताधिकारी कार्यालयाने आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार गणपतराव गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी अभिजीत भांडे-पाटील उपजिल्हाधिकारी रामदास दौंड, विजयानंद शर्मा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) प्रांजळ जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, कल्याण तहसिलदार जयराज देशमुख, उल्हासनगर तहसिलदार अक्षय ढाकणे, अपर तहसिलदार कौशल्यराणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.शिनगारे पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी फक्त महसूल दिन साजरा न करता “महसूल सप्ताह” साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने गरजू लाभार्थ्यांना महसूल विभागामार्फत जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यायचा, या पार्श्वभूमीवर राज्यात १ ते ७ ऑगस्ट २०२३ हा कालावधी महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला, या माध्यमातून विविध शासकीय दाखले, जमीन आदेश, सातबारा फेरफार असे विविध महसुली विभागांचे शासकीय लाभ गरजू लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
सदरचा विशेष कार्यक्रम खास माजी सैनिकांसाठी आयोजित करण्यात आला होता. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना जे काही शासकीय लाभ देता येतील ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आले, याचा मनस्वी आनंद होत आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काही माजी सैनिकांच्या कुटुंबियांना हा लाभ देऊ शकलो, याचे मनःपूर्वक समाधान वाटते. आपल्या सैनिकांनी देशासाठी जे बलिदान केले आहे त्यापुढे आम्ही काहीच नाही. आम्हाला आपली आपल्या कुटुंबियांचा सन्मान आणि सेवा करण्याची संधी मिळत आहे, हे आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी आमचे भाग्य समजतो, असे सांगून आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी आपल्याप्रति नेहमीच विनयशील राहू, या शब्दात श्री शिनगारे यांनी उपस्थित माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना आश्वासित केले.
ते पुढे म्हणाले, माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांमध्ये असलेल्या कौशल्याला वाव मिळण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण विभाग व महसूल विभाग मिळून कार्यशाळा आयोजित करू. त्यातून समाजासाठी विकासाच्या दृष्टीने चांगले योगदान मिळू शकेल.कुष्ठरोग रुग्णांच्या सेवेसाठी सन २०२१-२२चा पद्मश्री पुरस्कार मिळालेले गजानन माने आणि शौर्य चक्र विजेते लान्स हवालदार (नि.) सुनील मारुती रोमन यांच्यामुळे या व्यासपीठाचा बहुमान वाढला आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
आमदार गणपतराव गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सैनिकांप्रति नितांत आदरभाव असल्याचे सांगून सैनिक जे बलिदान देतात त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही मात्र जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे, ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
माजी सैनिकांना शासनाकडून जे लाभ दिले जातात त्या योजनांविषयीच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण प्रांताधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) प्रांजळ जाधव यांनी माजी सैनिकांसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तर मेजर (नि.) विजय दिघावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रांताधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी ध्वजदिन निधी संकलनाचा रुपये 3 लाख 25 हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) प्रांजळ जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी शशांक कल्याणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “स्वातंत्र्य गाथा-एक संगीत संध्या” या वाद्यवृंदाच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या सन्मानार्थ बहारदार संगीतमय देशभक्तीपर असा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसिलदार जयराज देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवरूनही करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली कल्याण प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *