राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती शिक्षण मंडळाचा पुढाकार
![]()

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती शिक्षण मंडळाचा पुढाकार
कल्याणमधील शिक्षक परिसंवादात २०० शिक्षकांचा सहभाग
कल्याण (मनिलाल शिंपी) विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व देशाचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने आणलेले नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती शिक्षण मंडळ सज्ज झाले असून कल्याणमध्ये संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात सुमारे दोनशे शिक्षक सहभागी झाले होते.
कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या पारनाका येथील अभिनव विद्यामंदिरातील डॉ. आनंदीबाई जोशी सभागृहात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ निमित्त ‘शिक्षक परिसंवाद २०२३-२४’ चे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी यांनी भूषविले संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे, सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे अभिनव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संपत गीते यांची प्रमुख उपस्थिती होती परिसंवादाचा उद्देश स्पष्ट करताना अध्यक्ष डॉ जोशी म्हणाले, कि केंद्र सरकारने 35 वर्षानंतर अभ्यासक्रमात मूलतः बदल केला आहे म्हणूनच आपण थाबलो तर संपलो. शिक्षणातील हे बदल आपण स्वीकारले पाहिजेत आपली गती – मन शरिर यात बदल करावे लागतील. नियमित व्यायाम, योगासने करावी, आपली गुणवत्ता तपासावी असे सांगितले.
परिसंवादाच्या पहिल्या सत्रात संस्थेच्याच शाळेतील उर्मिला जाधव यांनी विस्तृत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा मांडला. ईसीसीई धोरण, एनसीईआरटीचा आराखडा, सिपीडी म्हणजे काय ? वाचन संसकृती जोपासणे किती आवश्यक आहे यासारखे विषय लीलया हाताळून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले
दुसऱ्या सत्रात रोहिदास बगाड यांनी शिक्षण कालरेषा, राज्य शालेय मापक प्राधिकरण, 360 बहु आयामी अहवाल – यात शिक्षक मूल्यांकन, स्वमूल्यांकन, सहआद्याय मूल्यांकन, कला, क्रीडा यावर आधारित मूल्यांकन यावर चर्चा केली. C.P.D, शाळासंकुल तसेच PARAKH म्हणजे काय ? हे अभ्यासपूर्ण सोप्या भाषेत समजावले मा श्री तरटे सरांनीही नवीन शिक्षण धोरण राबविताना आपण काय करावे ? स्वतः कसे अपडेट रहावे याचे मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेच्या विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, उपस्थित होते.स्व रचीत गाणे ऐकवले, संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात झाली व शेवट पसायदानाने झाला.
या परिसंवादाची संपूर्ण संकल्पना व मार्गदर्शन संस्था सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे यांची होती.

