1 min read

सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जाते आहे
[ ‘ झंझावात ‘ या मुकूंद सपकाळे यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन….. ]

Loading

सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जाते आहे
[ ‘ झंझावात ‘ या मुकूंद सपकाळे यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन….. ]

सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जात आहे.’ असे मार्मिक प्रतिपादन
‘ झंझावात ‘ गौरव ग्रंथाच्या प्रकाशना प्रसंगी मार्गदर्शन करतांना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रिय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले.जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते तथा जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आयु.मुकूंद सपकाळे यांच्या जीवनाधारीत डॉ.मिलींद बागुल संपादित ‘ झंझावात ‘ गौरव ग्रंथाचे प्रकाशन शनिवार दि.५ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक उत्तम कांबळे असून प्रमुख अतिथी प्रतिभाताई शिंदे, सौ.भारती सपकाळे,करीम सालार,राम पवार,शालिक गायकवाड,साहित्यिक जयसिंग वाघ,सुरेश सोनवणे विचारपीठावर उपस्थित होते.

पुढील मार्गदर्शनात राजरत्न आंबेडकर म्हणाले की,’ आता समाजाने आपल्या शैक्षणिक,सामाजिक आणि आर्थिक पर्यायी व्यवस्था उभ्या करून डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित पुरोगामी समाजनिर्मिती करणे काळाची गरज आहे. समस्या आपल्या आहेत त्यामुळे संघर्षांती समाधान आपणच मिळविले पाहिजे. सत्ताधारी धार्मिक विद्वेष व धर्मांधतेच पोषण करतात मग वाघ वाचवा हे राष्ट्रीय अभियान राबविले जाते मात्र हिंदू धर्माचे ठेकेदार गोमाता वाचवा अभियान का चालवित नाही ? हा हिंदूत्ववाद्यांचा दुटप्पीपणा आंबेडकरांनी अधोरेखित केला.आजच्या कार्यकर्त्यांमध्ये साधनांची विपुलता आहे परंतु दुरदृष्टीचा अभाव आहे ही खंत व्यक्त केली.

मुकूंद सपकाळे यांचा सत्कार करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटना : –

  • भारतीय बौद्ध महासभा
  • आप्पासाहेब डी.आर.झाल्टे प्रतिष्ठान * मौलाना आझाद फाऊंडेशन * इकरा कॉलेज शैक्षणिक संस्था * भीमरमाई प्रतिष्ठान * लोकसंघर्ष मोर्चा * संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था * राष्ट्रीय भीमसेना * सत्यशोधक समाज संघ

* मराठा सेवा संघ * संभाजी ब्रिगेड * वाल्मिक एकलव्य सेना * सत्यशोधक विद्यार्थी संघटना * अथर्व प्रकाशन * कुमूद प्रकाशन * भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी * सत्यशोधक साहित्य परिषद * अन्य विविध संघटना व संस्था

प्राध्यापक डॉ.मनोहर जाधव ( प्रमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ) यांनी मुकुंदराव सपकाळे यांच्या ऐतिहासिक कार्यकर्तुत्वातील अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक,निर्भयता व तत्वनिष्ठा सोदाहरण सांगितली. डॉ.मिलिंद बागुल यांनी प्रास्ताविक केले.गौरव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश झाल्टे यांनी या कार्यक्रमासंबंधी आपली भूमिका व्यक्त केली.गौरव समितीचे निमंत्रक डॉ.करीम सालार यांनी मनोगतात मुकुंदरावांच्या कार्याचा आढावा घेतला.


मुकूंद सपकाळे यांनी केलेले उल्लेखनीय ऐतिहासीक लढे, आंदोलन व मोर्चे

  • महाराष्ट्रातील मागासवर्गीय शासकीय ५८ वस्तीगृहांचे खाजगीकरण शासन करणार होते त्या विरोधात समाज कल्याण मंत्री प्रतिभाताई पाटील कार्यकाळात पुणे आयुक्त कार्यालय समोर निदर्शने तसेच जळगाव, औरंगाबाद येथे आंदोलन यशस्वी करून २५००० विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला * मराठवाडा विद्यापीठ नामांतर * obc ची जात निहाय जनगणना समर्थन
  • आदिवासींना वनहक्क कायद्या अंतर्गत जमिनीचे हक्क मिळावे * मुस्लिम परिषद * जळगाव शहरातील झोपडपट्टी हटाव मोहिमेत अल्पसंख्यांकांची पाठराखण

मुकुंद सपकाळे यांचा नागरिक सन्मान उत्तम कांबळे, राजरत्न आंबेडकर, डॉ.मनोहर जाधव यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.सन्मानपत्राचे वाचन प्रा. डॉ.सत्यजित साळवे यांनी केले.गौरवार्थी आयु.मुकूंद सपकाळे यांनी सत्काराला उत्तर देतांना त्यांच्यातील झुंजार कार्यकर्ता निर्माण कसा व केव्हा झाला ? लग्नात पंगतीमध्ये पान वाढतांना झालेला जात्यांध अपमानाचा विद्रोही अन् जीवनाला ध्येयप्रवण करणारा संस्मरणीय प्रसंग सांगितला तसेच तत्कालिन समतावादी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी भास्करराव पाटील यांनी पिंप्राळ्यातील डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनंतर सरपंचांच्या विनंती ऐवजी संयोजक दलित कार्यकर्त्याच्या ( मुकूंद सपकाळे ) यांच्या घरी येऊन चहापान घेतला हा चैतन्यदायी किस्सा आणि त्याचवेळी जिल्हाधिकार्‍यांना ‘ नोकरी करण्यापेक्षा आजीव समर्पितपणे समाजोन्नती करणारा कार्यकर्ताच होईल ‘ या बाणेदारपणे दिलेल्या उत्तराचा विद्यार्थी दशेतील तत्वनिष्ठ प्रसंग सांगितला त्यावेळी उपस्थित भारावले.डॉ.मिलिंद बागुल संपादित ‘ झंजावात ‘ ग्रंथाचे प्रकाशन राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बापू पानपाटील यांनी केले.सत्कार समारंभास सचिन धांडे,विजयकुमार मौर्य,विनोद अहिरे,दिलीप सपकाळे,गौरव समिती सदस्य विजय लुल्हे,राजेंद्र पारे,प्रणाली सपकाळे,आकाश सपकाळे,महेंद्र केदारे,विजय करंदीकर, सचिन धांडे,संजय सपकाळे,रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे यांच्यासह सामाजिक चळवळी व संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *