1 min read

शिवसेना नोंदणी अभियानास उस्फूर्त प्रतिसाद

Loading

शिवसेना नोंदणी अभियानास उस्फूर्त प्रतिसाद
अमळनेर : शिवसेना युवा सेना महिला आघाडी, शिवसेना अमळनेर शहर व तालुका आयोजित सदस्य नोंदणी अभियानास ७ तारखेपासून सुरुवात झाली.
बसस्थानकाजवळील भांडारकर कंपाऊंडमधील शिवसेना कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, युवा शहर प्रमुख भरत पवार, तालुकाप्रमुख प्रथमेश पवार, संजय पाटील (भूत बापू), गुणवंत पाटील, उपसरपंच प्रवीण पाटील, बाळा पवार, सागरलाल महाजन आदी उपस्थित होते. या नोंदणी अभियानात तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वासुदेव पाटील व सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या अभियानाचे औचित्य साधत यावेळी उपतालुका प्रमुख पदाधिकारी यांची नावे सुचित करण्यात आली. त्यात तालुका उप प्रमुख संतोष आत्माराम पाटील (नंगाव तालुका-अमळनेर), सुभाष यादव पाटील (म्हसले), सुरेश आसाराम पाटील ( जानवे), निंबा धुडकू चौधरी (कळमसरे), आणि आकाश राजेंद्र भदाणे (वावडे) यांची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *