उत्तम आहार व निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली- डॉ.लिनेश्वरी बोरोले.
![]()



उत्तम आहार व निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली- डॉ.लिनेश्वरी बोरोले.
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात युवती सभेचा उद्घाटन समारंभ संपन्न.
जळगाव: के.सी.ई. सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि.७ ऑगस्ट २०२३रोजी युवती सभा मंडळाचे उद्घाटन शहरातील नामांकीत अँक्युपंचर तज्ञ डॉ. सौ. लिनेश्वरी हर्षल बोरोले यांच्या शुभहस्ते झाले.
याप्रसंगी त्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन युवतींशी आहार आणि आरोग्य संबधित अनेक महत्वपूर्ण बाबींवर डॉ. सौ.लिनेश्वरी बोरोले यांनी हितगुज साधताना जीवनात ॲक्युपंचरचे महत्व विषद करताना, त्यांना उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देत युवतींच्या आरोग्यविषयक विविध समस्या जाणून घेऊन त्यांच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत समर्पक मार्गदर्शन केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती.के.जी.सपकाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. श्री.आर.बी.ठाकरे, समन्वयक प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे उपस्थित होते. युवती समितीच्या अध्यक्षा प्रा.सौ.धनश्री पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रा.सौ.किरण महाजन यांनी सूत्रसंचालन तर प्रा.सौ.रुपम निळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्या प्रा.सौ.छाया चौधरी, प्रा.सौ. राजश्री महाजन, प्रा.सौ.शिल्पा सरोदे, प्रा.सौ.वर्षा पाटील, प्रा.श्रीमती.प्रज्ञा पाटील, प्रा. सौ.पल्लवी फिरके, प्रा. श्रीमती.कविता भारुळे, प्रा. श्रीमती.कांचन चौधरी, प्रा. श्रीमती.पुजा सायखेडे, प्रा. सौ.छाया पाटील यांनी परिश्रम घेतले.

