1 min read

उज्जैनकर फाउंडेशनची राज्य स्तरीय साहित्य संमेलनाची खामगाव येथे उत्साहात सभा संपन्न

Loading

उज्जैनकर फाउंडेशनची राज्य स्तरीय साहित्य संमेलनाची खामगाव येथे उत्साहात सभा संपन्न

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगावचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर साहित्य नगरी व भारताचे संविधान सभेचे सदस्य भवनजी अर्जनजी खिमजी व्यासपीठ ए. के. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव या ठिकाणी आयोजीत असून ही तिसरी सभा या विद्यालयाच्या या संमेलनाच्या निमंत्रक प्राचार्या डॉ. प्रविणा शहा यांचे अध्यक्षतेखाली याच विद्यालयात नुकतीच संपन्न झाली या प्रसंगी या संमेलनाच्या लोगोचे प्रकाशन, फाउंडेशनचे विविध पुरस्कारार्थी यांना पुरस्काराचे निवड पत्र देऊन सुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले याप्रसंगी या संमेलनाच्या आमंत्रण पत्रिकेचे सुद्धा या संमेलनाच्या निमंत्रक प्राचार्या डॉ. प्रविणा शहा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले याप्रसंगी या संमेलनाच्या निमंत्रक प्राचार्या डॉ. प्रविना शहा संमेलनाचे संयोजक डॉ. प्रवीण क्षीरसागर संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री किशोर गरड संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री विनोद डीडवानिया संमेलनाचे सह निमंत्रक डॉ. किशोर वानखडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर राज्य प्रसिद्धीप्रमुख ह.भ.प.शंकर महाराज राजपूत बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री पांडुरंग दैवज्ञ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार बुलढाणा जिल्हा सचिव श्री शंकरराव अनासुने जळगाव जिल्हा सल्लागार श्री मधुकर पोतदार श्री प्रविण जमदाडे उपाध्यक्ष सौ. नंदिनीताई वैराळ महिला प्रतिनिधी पूजाताई खेते बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री विजय बुडूखले अकोला जिल्हा समन्वयक डॉ. अशोक शिरसाट अमरावती येथील फाउंडेशनचे राज्य संघटक श्री आनंद महाजन खामगाव येथील श्री बाळूभाऊ ईटणारे श्री अशोक अनासुने श्री संतोष उंबरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी भरीव आश्वासन दिले तसेच या प्रसंगी संमेलनाच्या नियोजनाविषयी सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली या सभेचे सूत्रसंचालन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांनी केले तर आभार बुलढाणा जिल्ह्याचे समन्वयक श्री पांडुरंग दैवज्ञ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *