डोंबिवली येथील मातृश्री.के.एम.पटेल महाविद्यालयातील एनएसएस युनिट विविध पुरस्कारांनी सन्मानित
![]()

डोंबिवली येथील मातृश्री.के.एम.पटेल महाविद्यालयातील एनएसएस युनिट विविध पुरस्कारांनी सन्मानित. एनएसएस युनिट चां कॅडेट मुळे आमचा महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढली आहे.: प्राचार्या डॉ.माधुरी नंदनवार ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) श्री. डोंबिवली मित्र मडंळ संचालित मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य आणि विज्ञान ठाकुर्ली (पूर्व) च्या एनएसएस युनिट आणि नायर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने २०२२-२३ मध्ये रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. ह्या दिवशी एनएसएस युनिटच्या एकूण २९ एनएसएसच्या स्वयंसेवकांनी डोंबिवली स्टेशनवर रक्तदान शिबिरामध्ये मोलाचे सहकार्य देऊन नायर हॉस्पिटल ला जास्तीत जास्त रक्तदान करवून दिले. रक्तदान शिबिरामध्ये एकूण रक्ताच्या ६६ ब्लड बॅग नायर हॉस्पिटल ला मिळाल्या.हा आकडा जरी छोटासा असला तरी हयाने कोणाचे तरी प्राण वाचणे हे महत्वाचे.सी.एस.टी ते पनवेल रेल्वे स्थानकावर रक्तदान शिबीर करणारे बरेच महाविद्यालयांचे एन.एस.एस.युनिट होते. त्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्यांना “मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि मैत्री बोध परिवार” या संघटनेने दिनांक २५/०७/२०२३ रोजी सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच २०२२-२३ मध्ये डोंबिवली रेल्वे स्थानकावर रक्तदान शिबिर आयोजित करणारे एकमेव असे महाविद्यालय ते म्हणजे मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय. त्यासाठी महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित केले.या एक दिवशीय रक्तदान शिबिरामध्ये स्वयंसेवकापेक्षा स्वयंसेविका जास्त प्रमाणात राहून आपली समाजाबद्दल बांधिलकी जपली आहे. आपण भविष्यात आपल्या समाज्यासाठी आणखी प्रयत्न करू ही ऊर्जा ह्या पुरस्कारामुळे मुलांना मिळाली आहे. खरचं कोणतीही अपेक्षा न बाळगता हि मुलं समाज्याच्या हितासाठी झटत आहेत.मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांचा मार्गदर्शनाखाली , गणपती विसर्जन, नवरात्री उत्सव बंदोबस्त करण्यासाठी या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य पोलीस प्रशासनाला लाभत आहे मातृश्री.के.एम.पटेल महाविद्यालयातील एनएसएस चा कॅडेट चे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सर्व एनएसएस युनिट च्या कॅडेट यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी नंदनवार मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन, सहकार्य,आणि प्रेरना मिळत आहे एनएसएस युनिटचे शिक्षक याच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. अनंत उतेकर यांचे यासाठी विशेष योगदान आहे.

