पिंपळी तालुक्यातील पहीली आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत…
![]()
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्याचे पिंपळी येथील ग्रामपंचायतच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत नुकतच ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.. पिंपळी ही ग्रामपंचायत अमळनेर तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत आहे. अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार कॅबिनेट मंत्री मा.अनिल दादासाहेब पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत पिंपळी प्र ज ला सन 2022/2023 मध्ये आयएसओ 9001 :2015 मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सरपंच श्री.प्रेमराज वामन चव्हाण. उपसरपंच आबा वामन बहिरम. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक विवेक माधवराव सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.. नामदार अनिलदादा पाटील यांनी सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले..



