सुरेल संगीतमय गीतांच्या मेजवानीने मोहंमद रफी यांना पुण्यतिथीपर श्रद्धांजली अर्पण
![]()


सुरेल संगीतमय गीतांच्या मेजवानीने मोहंमद रफी यांना पुण्यतिथीपर श्रद्धांजली अर्पण
अमळनेरात सूर-संगम म्युझिकल ग्रुपतर्फे सुंदर आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील सूर-संगम म्युझिकल ग्रुपने विविध अशा सुरेल संगीतमय गीतांच्या मेजवानीने मोहंमद रफी यांना पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजली अर्पण केली.
शहरातील इंदिरा भवनात सुरेल “भुला ना पाओंगे” हा गीतांचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पोलीस निरीक्षक विजय शिंदे,अँड.ललिता पाटील,श्याम पाटील , हेमंत भांडारकर, सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन,खा. शि.मंडळाच्या उपाध्यक्षा माधुरी पाटील , कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, बापूराव महाजन यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व स्व.मोहंमद रफी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत सूर-संगम ग्रुपतर्फे सुनील वाघ , मिलिंद पाटील, उज्वल पाटील, पूर्वा कुलकर्णी, शिवानी वाघ, प्रा. रवींद्र माळी, मुन्ना शेख, देविदास बिरारी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. शोले चित्रपटाच्या अप्रतिम अश्या टायटल सॉंग ने सुरुवात झाल्याने पुढील कार्यक्रमाची उंची किती असेल याची कल्पना रसिकांना झाली. त्यानंतर “ओ साई बाबा मेरे,चरणोमे रखलो मुझे” हे “तोडी” रागातील सुंदर भक्ती गीत झाले. अमळनेरात अश्या उच्च पातळीवरील सुरेल गाण्यांच्या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने रसिकांची संगीतमय भूख भागवली गेली.
या कार्यक्रमाला तबला वादक – दादा वैद्य, पवन गुरव, आँक्टोपॅड-गंगाधर कढरे, की बोर्ड- सागर शिरसाठ,गौरव काळुंखे,बासरी वादक-संजय शिरसाठ, कोंगो वादक- विजय शुक्ल यांची उत्कृष्ट साथ सांगत लाभली.या कार्यक्रमाचे आयोजन सुनील वाघ,मिलिंद पाटील,उज्वल पाटील यांनी केले होते. श्याम जगताप यांनी सुरेख सुत्रसंचलन केले.
या गीतांनी श्रोते झाले मंत्रमुग्ध
सुनील वाघ यांनी -“अपनी आंखोमे बसाकर”, “ये दुनिया ये महेफिल”, ” तुम मुझे यु भुला ना पाओंगे”, दर्द ए दिल दरदे जिगर , ,”गंगा तेरा पानी अमृत”, “अखियन संग” उज्वल पाटील यांनी “खोया खोया चांद” “क्या हुवा तेरा वादा”, “दिलके झरोखेमे”, “तू इस तरह से मेरी जिंदगी मे”,
शिवानी वाघ यांनी “सुनो सजना”, “काटो को खिच के आंचल”,”कोई नहीं है फिर भी है मुझको” या गीतांनी एक वेगळा माहोल बनवून दिला होता. मिलिंद पाटील यांनी “अकेले है चले आओ जहाँ हो, प्रा. रवींद्र माळी यांनी ‘तेरी आँखो के सीवा” इत्यादी सोलो सॉंग्स तसेच ” ए परदा हटा दो”, “क्या हुवा तेरा वादा” “परबत के इसपार”.. हे युगल गीतांनी रसिकांची मने जिंकली. सुनील वाघ यांच्या “तुम मुझे यु भुला ना पाओंगे” उज्वल पाटील यांच्या “क्या हुवा तेरा वादा” मुन्ना शेख यांच्या “बदन पे सितारे” या गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि वन्स मोअर केले. सुनील वाघ यांच्या “अखियन संग लागे अखिया..!” या “मालकंस” रागातील शास्रीय गीताने शेवट होतांना लोक मंत्र मुग्ध झाले होते.

