स्वतःमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांना जोपासा.
हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.हेमंत पाटील यांचे प्रतिपादन.
![]()



स्वतःमधील सुप्त कला गुण ओळखून त्यांना जोपासा.
हास्य जत्रा फेम सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.हेमंत पाटील यांचे प्रतिपादन.
जळगांव: येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम.जे.कॉलेज जळगाव येथे नुकतेच हास्यजत्राफेम व मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख, सुप्रसिद्ध नाट्य कलावंत प्रा.श्री.हेमंत पाटील यांच्या शुभहस्ते कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात समई प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रा.श्री.हेमंत पाटील सरांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून त्यांनी कलाविश्व व अभिनय क्षेत्रातील संधी यावर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले व ज्यांना नाट्यशास्त्रामध्ये अभिरुची आहे त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले की, शैक्षणिक सिद्धता व कला जोपासणूक ही समांतर झाली पाहिजे. कलेची उपासना करताना समर्पित वृत्ती हवी. संघर्षाविना, प्रामाणिकपणाशिवाय कोणतेही यश मिळत नाही. यश मिळाल्यावर कायम मातीशी इमान राखा. ज्ञान मिळवा, संघर्ष करा व स्वतःला सिद्ध करा हाच जीवनाचा मूलमंत्र आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.श्रीमती करुणा सपकाळे, प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.सौ. स्वाती ब-हाटे, प्रा.उमेश पाटील व प्रा.प्रसाद देसाई व कला मंडळाचे अध्यक्ष प्रा. योगेश धनगर होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिपक चौधरी, प्रास्ताविक कला मंडळाचे अध्यक्ष प्रा.योगेश धनगर, प्रमुख उद्घाटकांचा परिचय प्रा.संध्या महाजन तर आभारप्रदर्शन प्रा.किरण कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.जयंत इंगळे, प्रा.निलिमा खडके, प्रा.सुर्यकांत बोईनवाड, प्रा.विजय भोई, प्रा.मयुरी हरिमकर यांनी परिश्रम घेतले.

