कृषि महाविद्यालय धुळे येथील कृषिदुतांचे अमळगांव येथे आगमन
![]()

कृषि महािद्यालय धुळे येथील कृषिदुतांचे अमळगाव येथे आगमन
अमळनेर प्रतिनिधी- कृषि महािद्यालय धुळे येथील अंतिम वर्षांतील विदयार्थी कृषिदुत सुहास काळे, घनश्याम नेवरे, अतनु मंडल, राहुल धोंडगे, प्रशांत इशी, चिन्मय धारपवार, राघवेश रेड्डी यांनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कार्यानुभव अंतर्गत अमळगाव येथे गावसर्वेक्षण केले. यावेळी ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय, तसेच महाविद्यालय येथे भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ सी. डी. देवकर, डॉ. पी. डी. सोनवणे, डॉ. संदीप पाटील,डॉ. सुनील पाटील, डॉ. व्ही. वाय. पवार, डॉ. जी. बी. काबरा,डॉ. के. के. बरहाटे, डॉ. आर. जे. देसले, डॉ. व्हीं. एस. गिरासे , डॉ.प्रशांत पवार, डॉ.प्रकाश पवार,डॉ. व्हि. पी. भालेराव, डॉ. एस. पी. निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीसंबंधी माहिती व मार्गदर्शन करणार आहेत.

