स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन ! ! !
![]()

स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन ! ! !
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी स्व. मधुसूदन सुरजमल मुंदडा ( श्यामदादा ) यांच्या 13 व्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी श्यामदादा यांच्या प्रतिमेस विद्यार्थी पालक श्री दीपक जानकीराम पारधी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसमवेत पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी श्याम दादा मुंदडा यांच्या जीवन परिचय सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर कथन करून दिला. सदर प्रसंगी शिक्षक- शिक्षिका -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे व रवींद्र चौधरी यांनी सहकार्य केले.

