भारतीय संस्कृती व संस्कार जोपासणारे तैतरिय उपनिषद
प. पू. आनंदजीवन स्वामी
![]()

भारतीय संस्कृती व संस्कार जोपासणारे तैतरिय उपनिषद
प. पू. आनंदजीवन स्वामी
अमळनेर – येथील स्वामी नारायण मंदीरात पुरुषोत्तम मासानिमित्त प. पू. आनंदजीवन स्वामींची
‘उपनिषद’ या विषयावर श्रवणीय पारायणमाला सुरु आहे. आजचे चौथे पुष्प त्यांनी तैतरिय उपनिषदातील सूत्रांचे विश्लेषण करून गुंफले. या उपनिषदाची रचना ‘दिक्षान्त प्रवचन’ स्वरूप
आहे. शुक्ल यजुर्वेदात त्याचा समावेश आहे. ऋषीमुनींनी गुरुकुल पद्धतीचा स्वीकार करीत शिष्यांना आचार-विचारांची समर्पक सूत्रांच्या आधारे “भारतीय संस्कृती” जोपासणारी अर्थपूर्ण संस्कार सूत्रांचे मार्गदर्शन केले. ते आजही मार्गदर्शक ठरतात “सत्यं वद”, धर्म चर, मातृ देवो भव,
पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव,” अशी शिकवण देणारी भारतीय संस्कृती आहे.”सत्य” व तत्व’ याचे संस्कार ती देते. आजच्या भौतिकवादी, भ्रष्ट, स्वयं केंद्रीत, स्वार्थी, जगाला
मार्गदर्शन करणारे तैतरिय उपनिषद आहे. स्वामी नारायण संप्रदायाने त्यातील तत्वांच्या आधारेच आपला “अक्षरपुरुषोत्तम” सिद्धान्त मांडला. त्याच्या आचरणात आपले कल्याण आहे ” असे विचार स्वामींनी सोदाहरण श्रोत्यांना पटवून दिले.
अगस्तीऋषि, आंगिरसऋषि, शौनकऋषि यांनी वैदिक तत्वज्ञान उपनिषदातील सूत्रांआधारे परिचित करून दिले. अथर्ववेदातील “मुंडकोपनिषद” अक्षर हेच परब्रम्ह या सिद्धांतावर आधारित
आहे. ‘द्रौ विद्ये, परःच अपरःच हे त्यातील महत्त्वाचे सूत्र आहे ‘ अपर ‘विद्या ही भौतिक विद्याआहे. “अध्यात्म” ही “पर” विद्या आहे. ती श्रेष्ठ आहेत. हरिभक्तांचे कल्याण करणारी आहे. अक्षर
रूप आहे. त्याचे पलिकडे “पुरुषोत्तम” रूपाचे अस्तित्व आहे. स्वामीनारायणांनी त्याचेच वर्णन ‘वचनामृतात ‘केले.
गीतेतील आठवा अध्याय या “अक्षरपुरुषोत्तम” स्वरुपाचे वर्णन करतो. या जगात जाणण्यासारखे ज्ञान म्हणजे पर स्वरूप असलेले “अध्यात्म ” आहे. परमतत्वांची चार स्वरूप
आहेत. ते ” व्यापक, सर्वोच्च, मूर्तिमान, प्रकटरुपाने प्रत्ययाला येते. “गुणातीतानंद स्वामी ” अक्षरमूर्ति होते. म्हणुनच स्वामीनारायणाच्या समुवेत त्यांचे चिंतन-भजन-पूजन संप्रदायात होते.
स्वामी नारायण संप्रदाय प्रणीत “अक्षरपुरुषोत्तम” सिद्धान्त उपनिषदांवर आधारित आहे. याच्या
आश्रयाने आपण कल्याण करून घेणे आवश्यक असल्याचे स्वामींनी आपल्या प्रवचनातून हरिभक्तांना सांगितले
दि. ५ ऑगस्ट रोजी या पारायणाची समाप्ती आहे. उपनिषदातील तत्व विचारांच्या आधारे “अक्षरपुरुषोत्तम” सिद्धांताचा परिचय पुरुषोतम मासानिमित हरिभक्तांना झाल्याचा आनंद श्रोत्यांनी
व्यक्त केला.

