शालेय विद्यार्थी डोळ्याच्या साथीने ग्रस्त
मुख्याध्यापक त्रस्त.
![]()

शालेय विद्यार्थी डोळ्याच्या साथीने ग्रस्त
मुख्याध्यापक त्रस्त.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
मुंबईसह राज्यातील राज्यातील अनेक ठिकाणी सध्या डोळे येण्याच्या साथीने चिंता वाढवली आहे. संसर्गजन्य असलेल्या या आजाराला आय फ्लू असे म्हणतात.
आय फ्लू म्हणजे काय?
आय फ्लू हा डोळ्यांना होणारा संसर्ग आहे. याला कंजंक्टिवायटिस आय असे म्हणतात. डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी वाहते असेही. सामान्य भाषेत याला डोळे येणे असंही म्हणतात.
शालेय विद्यार्थी या आजारांच्या साथीने ग्रस्त आहेत. अनेक शााळांमध्ये सध्या घटक चाचणी सुध्दा सुरू आहेत अशावेळी परीक्षेला अनुपस्थित शेरा मिळू नये पालक अनेकदा विद्यार्थ्यांना काळा चष्मा लावून शाळेत पाठवत आहे, तर आपल्या मुलांचे डोळे येतील या विचाराने इतर पालक डोळ्यांच्या आजाराने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊ नये अशी विनंती करत आहेत यामुळे शाळेतील वर्ग शिक्षक व मुख्याध्यापकही त्रस्त झाले आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यातील शाळेमध्ये डोळ्यांच्या विकाराने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना डोळे पुर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.

