कु.मानसी बिरारी हिस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त “साहित्यरत्न” पुरस्काराने गौरव.
![]()

कु.मानसी बिरारी हिस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त “साहित्यरत्न” पुरस्काराने गौरव. चोपडा,जळगाव ( मनिलाल शिंपी ):भारतीय साहित्य व साहित्यिक मंच लातूर जिल्हा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित काव्य लेखन दोन दिवसीय उपक्रमात चोपडा येथील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. मानसी निलेश बिरारी हिने उत्कृष्ट असे काव्य लेखन केले. त्याबद्दल कु.मानसी बिरारी हिस लातूर जिल्हा “साहित्यरत्न ” पुरस्कार म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.त्याबद्दल अखिल भारतीय मध्यवर्ती क्षत्रिय शिंपी समाज,आणि मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे डॉ. दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक उद्योजक डॉ रामचंद्र देसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत म्हात्रे,पोलीस पाटील संघटना भिवंडी चे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर, आणि उद्योजक डॉ.किशोर अढळकर यांचेकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत असून भावी आयुष्यातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. कु.मानसीचा या यशात तिचे आजोबा श्री.मनोहर बिरारी, आजी, काका काकू,आणि विशेष म्हणजे तिला शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रोत्साहन देऊन जिजाऊ, झाशी, सावित्री रुपी तिची आई सौ. वैशाली बिरारी यांची मोठी प्रेरणा आहे .तिचा या यशाबद्दल , आजोबा बाळकृष्ण निकुंभ, मामा राजू निकुंभ, आणि समस्त निकुंभ परिवार म्हसावद,तालुका शहादा ,जिल्हा, नंदुरबार, तसेच सर्व नातेवाईक , मित्र मंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

