साने गुरुजी कन्या शाळेत सरस्वतीला वाण
![]()

साने गुरुजी कन्या शाळेत सरस्वतीला वाण लावून जपली भारतीय संस्कृति
दि. 04/08/2023 रोजी साने गुरुजी शाळेत 9 वी च्या विद्यार्थ्यांनिनी विद्येची देवता सरस्वतीला वाण लावून भारतीय संस्कृतिचा परिचय संपूर्ण कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनिना करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. संदिपजी घोरपडे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष अॅड. बावीस्कर नाना हे होते. व्यासपीठावर मुख्याध्यापिका अनिता बोरसे मॅडम होत्या त्यांनी प्रस्तावना करतांना हा अधिक मास तीन वर्षांनी का येतो व जावयांना वाण का लावतात ह्या सर्व गोष्टींची ओळख करून दिली. अध्यक्षांनी आपण फक्त जावयांना वाण न लावता पत्नीच्या नातेवाईकांचा सुद्धा सन्मान करावयास हवा असे सांगितले. त्याच प्रमाणे अॅड. नानासाहेबांनी शाळेत असे विविध कार्यक्रम साजरा करून भारतीय संस्कृतीचा परिचय करून देतात असे सांगितले. 9 वी ब च्या सगळ्या विद्यार्थ्यांनिनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना व शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील वाण लावुन आभार मानले. सूत्रसंचालन ऋतुजा कदम सिद्धीका जाधव यांनी केले व आभार प्राची महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम व वर्गशिक्षक दिपक महाजन यांनी मेहनत घेतली व श्री. आर एम देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

