उपनिषद काळातील स्त्रिया शिक्षित व ज्ञानसंपन्न
प. पू. आनंदजीवन स्वामी
![]()

उपनिषद काळातील स्त्रिया शिक्षित व ज्ञानसंपन्न
प. पू. आनंदजीवन स्वामी
अमळनेर प्रतिनिधी:- प्राचीन काळातील नालंदा येथील ‘तक्षशीला’ विद्यापीठ अध्यात्मविद्येचे आश्रयस्थान होते. उपनिषदांचा तेथे जाणीवपूर्वक अभ्यास होत असे. भारतभूमी पृथ्वीमध्ये
श्रेष्ठ असून तो ज्ञानाचा देश आहे. भारतीय ज्ञान अनंत आहे, सत्य आहे, शाश्वत आहे. हे उपनिषदांच्या अध्ययनांतून सिद्ध झाले आहे. ‘कंठोपनिषदात याज्ञवल्क्य व गार्गी यांचा संवाद आहे. अणु-परमाणु रूप असलेले हे विश्व ‘काल व गती’ स्वरुपात शिस्तबद्ध आचरण करते. सूर्य पृथ्वी यांच्यातील प्रकाशकिरणांची गती कोण नियंत्रित करते यासंदर्भात
“गार्गी ” या ज्ञानसंपन्न स्त्रीने वर्णन केले आहे. उपनिषदांत गार्गी प्रमाणेच लोपामुद्रा,ब्रह्मवादिनी, दार्शनिका इत्यादी ज्ञानसंपन्न स्त्रीयांचे संवाद आहे. त्यावरून उपनिषद कालीन स्त्रीयां शिक्षित, प्रगत जीवन जगणाऱ्या होत्या हे सिद्ध होते. द्रौपदी – सीता रुक्मिणी या स्त्रिया व शिवकालीन जीजामाता याच परंपरेत येतात स्त्रीया अशिक्षित,अडाणी होत्या हा चुकीचा इतिहास आपल्याला शिकविला गेला. उपनिषदातील स्त्री संवादातील जाणतेपण व शास्त्रीयविचार प्रेरणादायी आहे ” असे विचार प.पू. आनंद जीवन
स्वामी यांनी उपनिषद मालिकेतील तिसरे पुष्प गुंफताना स्वामी नारायण मंदीरात
मांडलेत..
सृष्टितील ‘गती – समय संदर्भात उपनिषदात शास्त्रीय चिंतन आहे. याचे वर्णन करतांना स्वामींनी कृत त्रेता, द्वपार कली, या चार युगातील काळ मापनाचे सोदाहरण विवेचन केले.भगवंताने आपल्या सभोवताली असलेले ‘अवकाश’ सूक्ष्मतत्वाने विकसित केले. मन्वंतर-
कल्प काळानंतर ‘ब्रह्माचा एक दिवस व रात्र पूर्ण होतो. त्या काळानंतर प्रकाशवर्ष
ब्रह्मांण्ड ओलांडते. तेव्हा ‘अक्षरपुरुषोत्तमाचे दर्शन होते. वचनामृतात स्वामी नारायणांनी
त्याचे वर्णन केले आहे. परब्रह्माचे निर्गुण-निराकार रूप ‘परमतत्व आहे. ते जीवांच्या कल्याणासाठी प्रगट होते. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी हेच सांगितले आहे. आपण प्रमाण मानत असलेल्या ‘अक्षर – पुरुषोत्तमाचे श्रेष्ठत्व उपनिषदांनी कथन केले आहे. ‘पुरुषोत्तम मासानिमित्त उपनिषदांतील हा शास्त्रीयविचार समजून घ्या. त्यानेच जीवाचे कल्याण
आहे.’ असे उपस्थित हरिभक्तांना प.पू. आनंदजीवन स्वामींनी सांगितले प्रवचन श्रवणाचा लाभ असंख्य हरिभक्त घेत आहे. दि. ५ ऑगस्ट पर्यंत व्याख्यानमाला स्वामीनारायण मंदीरात रात्री ८.३० ते १० या वेळेत सुरू आहे. रसिक हरिभक्तांनी उपस्थिती द्यावी असे आयोजकांनी कळविले आहे

