1 min read

कृषी दुतांचे दहिवद गावात आगमन

Loading

कृषी दुतांचे दहिवद गावात आगमन

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय धुळे मार्फत राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत कृषीदूत नागेश्वर क्षिरसागर,मनोज केंचे, प्रसाद गायकवाड,सुशांत खामकर,हर्षवर्धन गायकवाड,अक्षय गावडे यांचे सरपंच मा. देवानंद बहारे , ग्रामविकास अधिकारी मा. शेखर धनगर व इतर ग्रामस्थांनी स्वागत केले . या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी.डी. देवकर सर , डॉ. पी. डी सोनवणे सर, डॉ. जी. बी काबरे सर, डॉ. आर. जे. देसले सर, डॉ. विक्रांत भालेराव सर , डॉ.व्ही. एस गिरासे सर,डॉ. संदीप पाटील सर, डॉ. संदीप पौळ सर ,डॉ. विकास पवार सर, डॉ.प्रशांत पवार सर, डॉ.सुनील पाटील सर, डॉ.संदीप निकम , डॉ.पंकज देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवद गावातील शेतकऱ्यांशी एकात्मिक कीड व्यवस्थापन,एकात्मिक तन व्यवस्थापन , एकात्मिक रोग व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय , उत्पन्न वाढीसाठी नवीन विकसित वाणांचा वापर , जैविक खतांचा वापर, मृदा व्यवस्थापन , एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि आधुनिक यंत्राचा वापर इत्यादी विषयांवर चर्चा केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *