1 min read

करणखेडा विद्यालयात वृक्षवल्ली फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण..

Loading

आज दि.03/08/2023 रोजी करणखेडा विद्यालयात वृक्षवल्ली फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण..
विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे ता. अमळनेर शाळेत वृक्षवल्ली फाउंडेशन कडून वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षवल्ली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ नीलिमा सोनकुसरे उपाध्यक्ष योगिता पांडे,अपेक्षा पवार ,स्वाती भावसार ,अनिता जाधव ,सुनिता वानखेडे शाळेतील शिक्षिका श्रीम.कल्पना सूर्यवंशी श्रीम.अर्चना सोनवणे , वृक्षवल्ली फाउंडेशन नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण असो किंवा सामाजिक कार्य असो नेहमीच भाग घेत असतात. त्यांनी 2018-19 ला लावलेली झाडे आज विद्यालयाच्या आवारात दिमाखात डोलत आहेत आणि शाळेच्या सौंदर्यात भर पाडत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. पवार सर, एस व्ही पाटील सर,अजय पांडे सर, मुरलीधर चव्हाण सर ,प्रशांत पाटील सर, धनगर सर शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र सोनवणे व किशोर शिसोदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *