उपनिषदांनी मानवाला परमात्म तत्वाचे महत्व लक्षात आणून दिले-प.पू आनंद जीवन स्वामी
![]()

उपनिषदांनी मानवाला परमात्म तत्वाचे महत्व लक्षात आणून दिले.
- प.पू. आनंद जीवन स्वामी,
अमळनेर प्रतिनिधी – सर्व वेदांचे सार असलेली उपनिषदे मानवी कल्याणप्रद आहे. उपनिषद,ब्रह्मसूत्रे, भगवतगीता ही प्रस्थानत्रयी आहेत. त्यांना ‘श्रुतिप्रस्थान’ म्हणतात.रामायण, महाभारत ही ‘स्मृतिप्रस्थाल’ आहेत. ब्रह्म व परब्रहम विद्येचे ज्ञान देणारे शास्त्र’ उपनिषद’ आहे. हे जग कसे चालते, या ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केली? त्यां परमतत्वाशी
जीवाचा संबंध कोणता? जीव कसा व का घडल ? सूर्य, पृथ्वी तारामंडळ यांची रचना कशी आहे. त्याचे नियंत्रण कोण करते? मी कोण आहे ? इत्यादी प्रश्नांची उत्तर देणारे ‘केनोपनिषद’ आहे.
या विश्वाचे नियंत्रण परमात्माला करतो. त्याचे स्तवन या उपनिषदात आहे ते जीवाला’मीपण’ नष्ट करण्याचे ज्ञान देते. सर्व भगवंत करतो ही भावना जोपासते.” असे विचार प.पू.आनंदजीवन स्वामी यांनी ‘उपनिषद’ विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना मांडले.
स्वामींनी कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद यातील विचारधारा सूत्रांचा आधार देऊन समजावून दिले. ही सर्व उपनिषदे सनातन सिद्धान्तांचे उपदेशन करतात भक्तीचे महत्व लक्षात आणून देणारे हे सिद्धान्त आहे. ते जीवाला ज्ञानसंपन्न करतात. त्यांची विवेकबुद्धी
जागृत करतात. ‘दिव्य’, सनातन, सत्य अशा वैदिक धर्माचे ज्ञान देतात. म्हणून उपनिषदांचे वाचन करा असे आवाहन स्वामीनी आपल्या प्रवचनातून केले.
‘बासरी बांबूचा तुकडा आहे. पण त्यात फुंकर मारून त्यातून सूर जोडणारा “श्रीकृष्ण” आहे. हा विचार उपनिषदांनी रुजविला आहे. “धैर्य’ सर्वश्रेष्ठ धन आहे. ते ‘मुक्ती ‘जवळ नेईल. मनुष्याला योग्यतेशिवाय काहीच मिळत नाही आपल्या जीवनात जे घडते ते चांगल्यासाठीच आहे. या भावलेले जगा. उपनिषदांच्या सनातन सिद्धान्तांवर स्वामी नारायण संप्रदायाची श्रद्धा
आहे. “सिद्धान्तं” सुविजानीयात् अक्षर ‘पुरुषोत्तमं’ असा उपनिषदांचा संदेश स्वीकारा. त्यातच जीवाचे कल्याण आहे. पुरुषोत्तम मासात त्यासाठीच “श्रीविष्णुंचे” आराधन आहे. ते श्रद्धेने करावे असे मार्गदर्शन स्वामींनी उपस्थित हरीभक्तांना केले दि. ५ मार्च पर्यत असलेल्या या
प्रवचनमालेला हरिभक्तांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वामीनारायण मंदिरातर्फे करण्यात येत आहे.

