ना.धो.महानोर रानात प्राण गुंतलेला कवी-प्रवीण दवणे
![]()

रानात प्राण गुंतलेला कवी
दूरच्या रानाला
लागिर उन्हाला
पारंबीचा झुला गेला
झुलत नभाला
ह्या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ओळी आज त्यांच्या देहरूप अस्तित्त्वानेच जणु नभाला पोहोचल्या आहेत. रान, मातीचा गंध ,शेतकऱ्याची दुःख ज्यांच्या कवितेत झिरपत राहिली, कवितेतून त्यांनी आपले आयुष्य पेरलं व ते सहा दशके बहरत राहिले, त्या भारतीय कविता समृद्ध करणाऱ्या गुंतलेले प्राण हे रानात माझ्या ही त्यांची ओळ अहोरात्र जगणाऱ्या कविवर्य महानोर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
प्रवीण दवणे

