अमळनेरला अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन,,,,
![]()

अमळनेरला अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन,,,,
अमळनेर प्रतिनिधी
ग्रंथालयाचे क्षेत्रात काम करतांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करता आले. व्याख्याने,परिसंवाद वक्तृत्व स्पर्धा यातून व्यक्तिमत्त्व विकसित होत असते याची कल्पना आली. वक्ते, स्पर्धक बोलायला उभे राहिले म्हणजे त्यांची भाषिक तयारी दिसून आली.ज्यांनी पूर्ण अभ्यासाने आणि प्रयत्नांने वक्तृत्व सिद्ध केले ते यशस्वी झाले. बर्याच लोकांना बोलणे म्हणजे निव्वळ बोलणे नसून तो भाषिक, वाचिक अभिनय असतो हे देखील माहिती नसते. म्हणून “अभिवाचन” कलेतून त्यांचे वक्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करावयाची आहे. अमळनेर मधील एक कुशल वक्ते, धडाडीचे कल्पक उपक्रमशील शिक्षक,श्री. संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
“अभिवाचन” या कला प्रकारात स्वारस्य असणार्या आणि काहीतरी वेगळे शिकण्याची इच्छा असलेल्या 15 ते 45 वयोगटातील तरुण, तरुणी तसेच स्त्री पुरुष यांना ही संधी उपलब्ध होत आहे.
यासाठी अमळनेर मधील इच्छुक व्यक्तींनी संपर्क करावा.
आपले नाव,पत्ता,शिक्षण संक्षिप्त परिचय खालील क्रमांकावर द्यावा.
श्री.संदीप घोरपडे 9422279710
भाऊसाहेब देशमुख 9420389541
(कृपया मर्यादित जागा आहेत याची नोंद घ्यावी असे एका पत्रकाद्वारे कळविले आहे

