1 min read

जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन !

Loading

जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन !

ठाणे, कल्याण ( मनिलाल शिंपी ): जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप जूनियर/सब ज्युनिअर स्पर्धेचे आयोजन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन परिमंडळ-१ चे उपायुक्त तथा महापालिका सचिव धैर्यशिल जाधव यांच्या हस्ते आणि नोडल अधिकारी तथा सहा. आयुक्त स्नेहा करपे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर स्पर्धा कल्याण पश्चिम येथील बी.के. बिर्ला स्कूल आणि शहाड येथील सेंचुरी रेऑन कंपनीचे मैदान येथे दिनांक ०२/०८/२०२३ ते दिनांक ०४/०८/२०२३ या कालावधीत होणार आहे.
यावेळी बी.के. बिर्ला स्कूलच्या प्राचार्या रंजना जांगरा, क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे व महापालिकेचे क्रीडा विभागातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बिर्ला स्कूल चे लक्ष्मण भांडे , क्रीडा संघटक कृष्णा बंनगर, कृष्णा माळी, अग्रवाल कॉलेज चे क्रीडा संचालक विजय सिंग, पवार पब्लिक स्कूल चे दार्वेकर सर, यांच्यासह क्रीडा विभागाचे संतोष पाटील, यांनी उत्कृष्ट असे स्पर्धेचे नियोजन केले आहे क्रीडा संघटक व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे मनिलाल शिंपी,संदीप परदेशी, बालक मंदिर चे क्रीडा पर्यवेक्षक जाधव सर,ओमकार इंटरनॅशनल स्कूल चा प्रतिभा मॅडम,सेंट थॉमस चे राम निंबाळकर, मंजुनाथ स्कूल चे गुरूस्वामी, आणि स्पर्धेत सहभागी शाळेतील सर्व क्रीडा संघटक शिक्षक बंधू भगिनी हे मैदानावर‍ उपस्थित राहून स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *