1 min read

वक्तृत्व स्पर्धेत अमोल पाटील प्रथम तर निबंध स्पर्धेत राजश्री देशमुख प्रथम

Loading

प्रताप महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न

वक्तृत्व स्पर्धेत अमोल पाटील प्रथम तर निबंध स्पर्धेत राजश्री देशमुख प्रथम

अमळनेर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्वायत्त महाविद्यालयांना दि.२४ ते २९ जुलै दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सप्ताह साजरा करण्याचे निर्देश केले होते. त्याअनुषंगाने प्रताप महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रताप महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावर पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक अमोल दिलीप पाटील (टी.वाय.बी
सीए), द्वितीय गौरव संजय पाटील (टी.वाय.बी.सीए), तृतीय सारिका भास्कर झाल्टे (टी.वाय.बी.कॉम), उत्तेजनार्थ एक : सुमित राजेंद्र महाजन (११वी),उत्तेजनार्थ दोन : कीर्ती सतिलाल पाटील (टी.वाय.बीए), यांनी नंबर पटकावला.
निबंध स्पर्धेत प्रथम राजश्री ज्ञानेश्वर देशमुख (एम.एस्सी द्वितीय वर्ष), द्वितीय अश्विनी भूपेंद्र सैंदाणे (टी.वाय.बीए), तृतीय मेघना प्रकाश पाटील (एफ.वाय.बी.कॉम), उत्तेजनार्थ एक : आकांक्षा शत्रुघ्न भदाणे (टी.वाय.बी.एस्सी) उत्तेजनार्थ दोन : मितुल मनोजकुमार झाला (टी.वाय.बी.कॉम) यांनी यश संपादन केले.
याप्रसंगी संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जयेश गुजराथी, डॉ. जी.एच.निकुंभ, डॉ.कल्पना पाटील, डॉ.जयंत पटवर्धन, प्रा.पराग पाटील, डॉ.विजय मांटे, सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर, NEP समन्वयक डॉ. मुकेश भोळे उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, प्रा.योगेश पाटील व प्रा.प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे संयोजन मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश माने यांनी केले तर डॉ. विलास गावीत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. खान्देश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *