1 min read

बळसाने येथे विद्यालयात महसूल सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रम संपन्न

Loading

बळसाने येथे विद्यालयात महसूल सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रम संपन्न
धुळे (प्रतिनिधी )दिनांक 2 ऑगस्ट रोजी
बळसाने येथील कै. ए .एन. जी .माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बळसाने ता. साक्री जि.धुळे येथे १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. एस सी ,एस टी ,एन टी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे दाखले व विविध दाखले यांची माहिती देण्यात आली व काही शालेय विद्यार्थ्यांना जातीचा दाखला व उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील प्राचार्य जे. के. धनुरे सर होते . कार्यक्रमाला साक्री पंचायत समिती सदस्य महावीरभाऊ जैन गावातील लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर हलोरे, उपसरपंच .मोतीलाल खांडेकर गावातील पोलीस पाटील, आनंदा पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य निंबा धनुरे , युवराज चव्हाण दंगल हालोरे . व गावातील प्रतिष्ठित शेतकरी वर्ग, महसूल विभागातून बळसाने बीट चे मंडळ अधिकारी श्रीमती आंधळे ,तलाठी शैलेश कदम .लोणखेडी येथील तलाठी श्रीमती गवई , इंदवे येथील तलाठी तानाजी वाझे .बळसाने गावातील ग्रामसेवक बागले भाऊसाहेब. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वरील सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले या प्रसंगी शाळेतील प्रा. अनिता दुसाने , श्री यशवंत दुसाने . प्रा.देवेंद्र कंखर , प्रा .चेतन पाटील ,प्रा. भूषण हलोरे. तुकाराम अहिरे प्रा.सुनील गांगुर्डे आधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.मनोहर मोहने यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *