1 min read

अमळनेरला मनोहर भिडे गुरुजी यांचा फुले प्रेमींकडून प्रतिमात्मक पुतळा दहन

Loading

मनोहर भिडे गुरुजी यांचा फुले प्रेमींकडून प्रतिमात्मक पुतळा दहन

विविध सामाजिक संघटना यांचा समावेश

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यतील फुले प्रेमी यांच्या तर्फे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करून प्रशासनास जाहीर निषेधाचे निवेदन विविध सामाजिक संघटना यांच्या तर्फे आज रोजी देण्यात आले थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या बद्दल मनोहर कुलकर्णी यांनी घाणेरडी भाषा वापरून अपमान केला या कृतीचा जाहीर निषेध करून भिडे यांच्याबर गुन्हा नोंदवण्याची मागणी विविध सामाजिक संघटना यांनी केली आहे.यावेळी माळी वाडा फुले स्मारक येथे प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करून तहसीलदार प्रांत यांना निवेदन देण्यात आले यावेळी क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख महेंद्र महाजन, क्षेत्रिय फुलमाळी समाजाचे उपाध्यक्ष दिनेश माळी, क्षत्रिय काच माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा पदाधिकारी भीमराव महाजन, योगेश महाजन,प्रताप पाटील व विविध सामाजिक संघटना त्यात क्षत्रिय माळी समाज संघटना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले विचारमंच महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *