1 min read

वर्ल्ड पार्लमेंटची शिक्षक – प्राध्यापकांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय सन्मान योजना

Loading

वर्ल्ड पार्लमेंटची शिक्षक – प्राध्यापकांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय सन्मान योजना समाजाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार असलेल्या शिक्षकाला गौरवान्वीत करण्याचा " शिक्षक दिन " हा सुवर्णदिन आहे. याच शिक्षकदिनाचा दुग्धशर्करा योग साधत डब्ल्यूसीपीए सर्वच स्तरांतील शिक्षक - प्राध्यापकांना सन्मानित करण्यासाठी विशेष

“आंतरराष्ट्रीय सन्मान योजना” घेऊन येत आहे.
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) जागतिक स्तरावर सामाजिक, पर्यावरण कायदेविषयक कामे करते. याच संस्थेची अर्थ कॉन्स्टीट्यूशन इंस्टिट्यूट (ईसीआय) ही पोटशाखा संविधानिक कार्य करते. याच शाखेद्वारे शैक्षणिक व कायदे संदर्भात कार्य चलते.
याच माध्यमातून आधुनिक युगातील विद्यार्थ्यांना प्रगल्भ व गुणवान बनविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिक्षकांना सन्मानीत करण्याची संधी डब्ल्यूसीपीए साधणार आहे.
त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, त्याचबरोबर मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळा कॉलेजांव्यतिरिक्त इतरही भाषांच्या शाळा व महाविद्यालयाचे समकक्ष देखील सदर उपक्रमात आपला सहभाग नोंदवू शकतात.
तरी संबंधीत इच्छुकांनी सदर पत्रक हाती पडताच ९०९६३७२०८२ या क्रमांकावर व्यक्तीशः फोन करायचा आहे. त्यानंतरच आपला प्रस्ताव
wcpashrirampur@gmail.com या मेल आयडीवर पाठवायचा आहे.
असे डब्ल्यूसीपीएने काढलेल्या स्पेशल न्युज बुलेटिनमध्ये म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *