उपनिषद” हे दिखावाचा अनुभव देणारे वाड:मय “
![]()
“उपनिषद” हे दिखावाचा अनुभव देणारे वाड:मय “
पूज्य आनंदजीवन स्वामीजी”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अभयनेट ‘भारतीय संस्कृति घडविणारी व जोपासणारी “ज्ञानाची सरिता खाते उपनिषद’ होय सर्व वेदांचे सार आहे. मनुणाल आत्मज्ञानाचे अमृत देणारी कामधेनू उपनिषद आहे. ते झारमा के’ उपम आहे त्याच्या आश्रयाने ज्ञानी माणसाणे ‘दिव्यत्वाची’ प्रचिती येते. आत्मज्ञान प्राप्त होते. परमात्मतत्वाचा साधा भार होतो. उपपदांचे अध्ययन आवश्यक आहे” असे विचार प. पू. आनंदी जीवन स्वामी कोठारी, धुळे यांनी अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरातर्फे आयोजित पारायण सत्रात विचार मांडले.
केनोपनिषद, श्रीमाननीय शास्त्रीय विवेचनात आलिकज्ञानाचे वर्णन आहे. मानवी मनातील अनेक संशयाचे – छेदन करणारे ते शास्त्र आहे स्वामी विवेकानंदाच्या मते आत्मिकशक्तीची खाण म्हणजे उपनिषद आहे. विनोबा भावे ” माझ्या आईची आई म्हणजे उपनिषद, ते वात्सल्यरूप आहे. कल्याणकारक आहे असे म्हणतात. पाश्चिमात् विचारवंतानीही उपनिषदांची थोरवी वर्णन केली आहे. जर्मन शास्त्रज्ञ मैक्समूलर यांच्या मते ‘मानवी मस्तकातील सर्वोत्तम चिंतन म्हणजे भारतीय उपनिषद आहे. ते सर्वोत्तम ज्ञानाबरोबर शांती प्रदान करते : शंकराचार्यांनी ‘सर्व शास्त्रस्य लोचनं उपनिषद ” असा उपनिषद वाङ्मयाचा गौरव केला आहे.
उपनिषरांचा कर्ता कोन? प्रश्नापेक्षा उपनिषदानी 245 ‘परमात्मतत्वाचे अलौकितत्वाचे दर्शन घडविणारे सामर्थ्य महत्वाचे आहे. त्यातील छोटे सूत्र आशय संपन्न आहे. ‘कमीत कमी शब्दांत मोठे सिद्धांत मांडणारे ते श्रेष्ठ वाङ्मय आहे. उपनिषद – म्हणजे जवळ बसून
मिळविलेले ज्ञानाचे भांडार आहे. मानवाचे भाव स्वभाव – प्रभाव’ जोपासणारे ते श्रेष्ठ साहित्य आहे पुरुषोत्तम मासात त्याचे ज्ञानग्रहण करून स्वतःचे कल्याण करुन ‘घ्या’ असे आवाहन प. पू. आनंद जीवन स्वामीनी आपल्या प्रथमदिन प्रवचनातून हरिभक्ती केले आहे.
स्वामी नारायण मंदिरात ५ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या पारायण सोहळ्यात उपस्थित राहुन ‘उपनिषदांचे’ ज्ञान प्राप्त करून घ्यावे. अमळनेरकर हरिभक्तांना ही मोठी संधी आहे असे आवाहन स्वामीनारायमण मंदिरातर्फे करण्यात येत आहे.

