मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चात आंबेडकरी जनतेने बहुसंख्येने सहभागी व्हावे
मुकुंद सपकाळे यांचे आवाहन
![]()

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चात आंबेडकरी जनतेने बहुसंख्येने सहभागी व्हावे
मुकुंद सपकाळे यांचे आवाहन
अन्याय, अत्याचार आणि शोषणग्रस्तांची जात, धर्म किंवा कुठलाही पंथ असत नाही अशा साऱ्यांनाच माणूस म्हणून मदत करण्याची त्यांना एक जीवन जगण्याची हमी मिळवून देण्यासाठी माणसातली माणुसकी जागृत करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आली असून अतिशय घृणास्पद आणि निंदास्पद असणाऱ्या घटनेचा निषेध करणे अत्यंत आवश्यक असून अशा घटना देशात पुन्हा घडू नये यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलनाची गरज असल्याचे मत मनिपुर घटनेच्या निषेधार्थ दिनांक ४ रोजी आयोजित केल्या गेलेल्या आक्रोश मोर्चाच्या नियोजित बैठकी प्रसंगी आंबेडकरी जनतेला आव्हान करताना महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंद सपकाळे बोलत होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विश्वासराव बिऱ्हाडे हे होते.याप्रसंगी डॉ. मिलिंद बागुल यांनी मनोगत व्यक्त केले तर रवींद्र तायडे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार बापूराव पानपाटील यांनी मानले बैठकीस दिलीप भाऊ सपकाळे, सुरेश तायडे, भाऊराव इंगळे, राजू मोरे, भारत सोनवणे, दिलीप अहिरे, साहेबराव वानखेडे, सुरेश तायडे, सोमा भालेराव, युवराज सुरवाडे, वाल्मीक सपकाळे, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, गोपाळ भालेराव, जगदीश सपकाळे महेंद्र केदार व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

