1 min read

मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज अमळनेरात सुरेल गीतांचा कार्यक्रम

Loading

मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अमळनेरात सुरेल गीतांचा कार्यक्रम
अमळनेर प्रतिनिधी- माणसाचे जीवन धकाधकीची झाले आहे. एकीकडे आपण म्हणतो प्रगती झाली पण माणूस अनेक सवयींचा गुलाम झाला आहे.. याच्या मुळे अनेक वाईट घटना आपण पाहतो माणसांना एकच गोष्ट आहे ती अनेक संकटातून बाहेर काढू शकते ती म्हणजे संगीत म्हणून अशा संगीताच्या कार्यक्रमातून नागरिकांचे वैचारिक प्रबोधन होते व मनाला शांती मिळते याच धरतीवर अमळनेरला संगीताचा कार्यक्रम
स्व.मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज दि 2 ऑगस्टला सांयकाळी ६.३० वाजता शहरातील इंदिराभवनात सुरेल गीतांचा कार्यक्रम “भुला ना पाओंगे” चे आयोजन करण्यात आले आहे.
सूर संगम म्युझिकल ग्रुप तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रसिक प्रेक्षकांसाठी हा विनामूल्य कार्यक्रम आहे.
सुनील वाघ,मिलिंद पाटील ,उज्वल पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.