1 min read

घाटकोपर बालविकास प्रकल्प अंतर्गत जागतिक स्तनपान सप्ताहास सुरुवात

Loading

घाटकोपर बालविकास प्रकल्प अंतर्गत जागतिक स्तनपान सप्ताहास सुरुवात. 👉

घाटकोपर ( मनिलाल शिंपी ):एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी घाटकोपर अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली घाटकोपर मधील सर्व २५३ अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात १ ते ७ आॕगस्ट २०२३ या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह २०२३ साजरा केला जात आहे..सदर सप्ताहात “स्तनपान सक्षम करणे: काम करणाऱ्या पालकांसाठी एक फरक”या थीमवर आधारित जनजागृती केली जात आहे..या वर्षीच्या थीममध्ये सामान्य आणि सिझेरियन दोन्ही प्रसूतीमध्ये बाळाला जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपानाची लवकर सुरुवात सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे..या सप्ताहात प्रभावी जनजागृती करण्यासाठी प्रकल्प कार्यक्षेत्रात पुढील ७ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे..सर्व विभागांमध्ये आज रॕलीचे आयोजन करण्यात आले होते..पुढील ७ दिवस मुक्त संवाद, चर्चासत्र, नुक्कड नाटक, गृहभेटी याद्वारे कुटुंबांना बाळाच्या जन्मानंतर एका तासाच्या आत करावयाच्या स्तनपानाचे व एक हजार दिवसांचे महत्व पटवून दिले जाणार आहे..यासाठी अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात अंगणवाडी सेविका व मदतनिस आहे..या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी श्रीम.वैशाली खोपाळे ,श्रीम.वैभवी मयेकर श्रीम.अरूणा कालेकर ,श्रीम.संगिता शिंपी,श्रीम नंदिनी वरदम या मुख्यसेविका सर्व अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *