अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ महादान! दुर्गाडी किल्ल्यातील गरीब वस्तीमध्ये २५० गरीब गरजूंना पोहे,उपमा, गुलाबजाम चे वाटप..
![]()


अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ महादान! दुर्गाडी किल्ल्यातील गरीब वस्तीमध्ये २५० गरीब गरजूंना पोहे,उपमा, गुलाबजाम चे वाटप..
कल्याण ,(प्रतिनिधी):
रोटी डे ग्रुप चे नितील चंदेरीया,कच्छ युवक संघाचे तरूनभाई नागडा, स्वामीनारायण हॉल चे दिनेश भाई ठक्कर यांच्या माध्यमातून,अन्नदान हेच खरे सर्वश्रेष्ठ महादान आहे, हा संकल्प करून, दर रविवारी कल्याण, डोंबिवली, टिटवाला परिसरातील गोरगरिबांसाठी, रोटी डे सुरू करण्यात आला असून कल्याण तालुक्यातील हातमजुरी करणारे कामगार, बिगारी , वीटभट्टी कामगार, आणि शहरातील कष्टकरी कामगार वस्तीतील गरीब लोकांना , पूरी भाजी, पावभाजी, पोहा, उपमा, फळे, स्वीट असे वाटप करण्यात येते, आज देखील मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे यातून रोटिडे,ग्रुपचे , डॉ.नितिल चंदेयिया, मयंक भाई, डॉ.निलेश भाई, तसेच कच्छ युवक संघाचे डॉ.तरुण नागडा,मनोज भाई, डॉ.गोपाळ राठोड, मयंक भाई, जतीन जोशी, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक आणि मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील, यांच्या सहकार्याने ही सेवाभावी टीम अन्नदान यज्ञाचे आयोजन यशस्वीपणे अखंड करीत आहे. प्रत्येक सणाला देखील मिष्टान्न भोजन, दिवाळी फराळ, कपडे, खेळणे, संसार उपयोगी वस्तू अश्या अनेक स्वरूपात हे देवदूत जनसेवा करीत आहेत, या देवदूत सेवाधारी ग्रुपचा त्यांनी केलेल्या सामाजिक बांधिलकीचा, व मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा घेतलेला वसा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला त्यामुळे महाराष्ट्राचे तत्कालीन महामहीम राज्यपाल आदरणीय भगत सिंग कोष्यारी यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे या सर्वांचा “समाज सेवा गौरव पुरस्कार ” देऊन सन्मान करण्यात आला आहे. रोटी डे ग्रुप चे सर्व समाजसेवक ,कच्छ युवक संघाचे सर्व पदाधिकारी, स्वामीनारायण सभागृहाचे चे संचालक डॉ.दिनेश भाई ठक्कर , मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांचे संपूर्ण महाराष्ट्रात १८ जिल्ह्यांमध्ये ऊसतोड मजुरांना ब्लेंकेट,साड्या, आदिवासी भागात शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नधान्य वाटप, असे नियमित उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे या उपक्रमा बरोबर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रातून सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे .
या स्तुत्य उपक्रमांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आवाहन दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील व मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.श्री. मणिलाल शिंपी यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून केले आहे……

