ठाणे जिल्हा मुख्याध्यापाक संघाच्या वतीने अनुदानावर येणाऱ्या शाळा व शिक्षकांकरिता मार्गदर्शनपर बैठक संपन्न. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मार्गदर्शनाने विशेष मार्गदर्शन.
![]()

ठाणे जिल्हा मुख्याध्यापाक संघाच्या वतीने अनुदानावर येणाऱ्या शाळा व शिक्षकांकरिता मार्गदर्शनपर बैठक संपन्न. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मार्गदर्शनाने विशेष मार्गदर्शन.
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ): आज दिनांक 31.07.2023 रोजी ठाणे जिल्हा मुख्याध्यापाक संघाच्या वतीने ठाणे व पालघर जिल्ह्यातील अंशतः अनुदानीत, नव्याने येणाऱ्या 20% अनुदानावर शाळा, अनुदानीत शाळा व शिक्षकां करिता मार्गदर्शन सभा आयोजीत करण्यात आले होते, या सभेस कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थीत राहून मार्गदर्शन केले. शिक्षकांना अजून अनुदान का ? मिळत नाही, मिळालेले अनुदान अजून खात्यात जमा होत नाही, आवक जावक जुळत नाहीत, काही शाळांना पात्र होऊन देखील अजून अनुदानाचे आदेश मिळाले नाहीत अश्या अनेक प्रश्नावर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्रुटी पूर्तता शाळांची यादी लवकर पात्र करून अनुदान देणे याकरता पाठपुरावा सुरू आहे, संच मान्यता मधील दुरुस्त्या माव्यात याकरता संचालकांकडे पाठपुरावा सुरू आहे , विना अनुदानावर अनुदानावर बदली स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, शेवटच्या वर्गाची पटसंख्या शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, संच मान्यतेसाठी 30 नोव्हेंबर ऐवजी 30 एप्रिल 2023 ची विद्यार्थी संख्या धरावी, विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशन साठी येणाऱ्या अडचणी विषय मार्गदर्शन केले, माझ्या मतदार संघातील एकही शिक्षक जे अनुदानाच्या यादीमध्ये आहेत ते अनुदानावाचून वंचित राहणार नाही, आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही त्या करीता मी आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे, आपण अजीबात चिंता करायची नाही असा विश्वास शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांना दिला.
अनूदान वितरीत कारण्यासंदर्भात टप्पा क्रमांक 2 नुसार FIR करण्याची प्रक्रिया किचकट असून त्या संदर्भात काही शासन स्तरावर अजून काही बदल करून अथवा ती प्रक्रिया सुरु ठेऊन अनूदान वितरीत करण्याकरिता मी सतत शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, आयुक्त, शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बरोबर सतत चर्चा, मिटिंग करीत असून त्यातील काही अटी शिथिल करण्याचे काम सुरू आहे,लवकरच आपल्या पदरी अनूदानाची शिदोरी पडेल यात काही शंका नाही , आपल्या सर्वांना गणपती बाप्पा नक्कीच प्रसाद देईल असा विश्वास देखील व्यक्त केला. त्यामुळे आपण शिक्षकाने संयम ठेवावा आधिकारी यांना सहकार्य करावे असे देखील आवाहन केले. यासमयी ठाणे जिल्हा मुख्याध्यापाक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील ,. विष्णू विशे , प्रशांत भामरे, अनिल पाटील,अनंत किनगे , प्रकाश मगर,शरद बोरसे , भाई पष्टे,पानसरे सर, आर. डी. पाटील , अर्जुन उगलमुगले, जाधव सर, बन्सीलाल महाजन, कांबळे सर, बाळकृष्ण जगे, आणि जवळपास 200 शिक्षक व शिक्षक भगिनी उपस्थीत होत्या.अशी माहिती
ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी आमचा प्रतिनिधीशी बोलताना दिली.

