लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली भविष्यात लाभदायक ठरणार- उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर
![]()
महादेव खेडकर उपविभागीय अधिकारी अमळनेर यांचे प्रतिपादन
लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली भविष्यात लाभदायक ठरणार
महादेव खेडकर उपविभागीय अधिकारी अमळनेर यांचे प्रतिपादन
महसुल दिनानिमीत्त महसुल अधिकारी कर्मचारी यांचे १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत १३ पाल्यांचा झाला सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०२३/प्र.क्र./१४९/ई-१ दिनांक- २५/०७/२०२३ अन्वये दि. ०१/०८/२०२३ ते दि. ०७/०८/२०२३ या कालावधीत महसुल सप्ताह आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आज दि. ०१/०८/२०२३ रोजी ई-हक्क प्रणाली बाबत मार्गदर्शन, प्रचार व प्रसिध्दी करीता
नागरीक मदत कक्ष तहसिल कार्यालय अमळनेर येथे सुरु करण्यात आला असुन श्री. गोपीचंद सिताराम कोळी
(शेतकरी) रा. पाडसे व मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या हस्ते फीत कापुन उद्यघाटन करण्यात आले.
लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली भविष्यात लाभदायक ठरणार असुन त्याअंतर्गत ई-करार बोजा
दाखल करणे, गहाणखत बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे अ.पा.क
कमी करणे, ए.कु.क कमी करणे, विश्वस्त नाव बदलणे, संगणकीकृत ७/१२ व हस्तलिखित ७/१२ चुक दुरुस्ती
या ९ प्रकारचे फेरफारांसाठी खातेदारांना P.D.E. (Public data entry) मधुन अर्ज करता येणार आहे.
महसुल दिनानिमीत्त महसुल अधिकारी कर्मचारी यांचे १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत १३ पाल्यांचा
गुणगौरव मा. श्री. महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी अमळनेर व श्री. रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार
अमळनेर यांच्या हस्ते करण्यात आला.
सुंदर माझे कार्यालयाअंतर्गत तहसिल कार्यालय अमळनेर चे आवार स्वच्छ करुन सुशोभिकरण करण्यात आले.
दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ ते दि.०७ ऑगस्ट २०२३ दरम्यान महसुल दिन साजरा करणे, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसुल संवर्गातील कार्यरत/ सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी संवाद व महसुल सप्ताह सांगता समारंभ या कार्यक्रमांचे आयोजन उपविभागीय अधिकारी अमळनेर व तहसलि कार्यालय अमळनेर यांचे मार्फत मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचे मार्गशनाखाली केले जाणार आहे. तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, महसुल सप्ताह अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा असे
रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर यांनी केले आहे.

