1 min read

उपप्राचार्य डॉ. जयेश गुजराथी सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न

Loading

उपप्राचार्य डॉ. जयेश गुजराथी सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख, उपप्राचार्य, आयक्यूएसी समन्वयक डॉ. जयेश गुजराथी यांचा सेवापूर्ती सोहळा दि.३१जुलै रोजी संपन्न झाला. रसायनशास्त्र विभागात त्यांनी ३३ वर्षे सेवा बजावली आहे. त्यांनी महाविद्यालयापासून तर विद्यापीठस्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. महाविद्यालयातील RUSA विभागाच्या कामात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. या कृतज्ञतेतून त्यांचा एन.मुकटो, एन.मुक्ता, व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने महाविद्यालयात सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन होते. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, प्रा. नितीन पाटील, माजी प्रा. सुधीर पाटील, सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर.शिरोडे, डॉ. निखिल बहुगुणे, यांनी डॉ. जयेश गुजराथी यांच्याप्रती असलेला स्नेहभाव व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. गुजराथी म्हणाले की, “खान्देश शिक्षण मंडळ व प्रताप महाविद्यालयाकडून मला नेहमीच सहकार्याची भावना मिळाली, प्रेम मिळालं, आशीर्वाद मिळाला, आणि काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे अनंत ऋण माझ्यावर आहेत. अनेक मानाची पदे मला मिळाली. त्यातच मी कृतकृतार्थ झालो आहे.” अशी भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ए.बी.जैन म्हणाले की, “महाविद्यालयात कार्यतत्पर, सेवावृत्तीने, आणि समर्पण भावनेने काम करणारे डॉ. गुजराथी यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने काम केले. त्यांनी NAAC ची मुख्य जबाबदारी पार पाडली. इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या.” अशी भावना यावेळी व्यक्त केली.
यावेळी माजी प्रा. रमेश बहुगुणे, डॉ. निखील बहुगुणे, डॉ. शरद बाविस्कर,माजी उपप्राचार्य, डॉ. भावसार, डॉ.पी.आर.शिरोडे, उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर संस्थेचे सहसिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्रचार्य डॉ. जयंत पटवर्धन, डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. पराग पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. विजय मांटे, डॉ. निलेश पवार, शिक्षकेतर प्रतिनिधी विजय ठाकरे, विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच डॉ. जयेश गुजराथी यांच्या पत्नी सौ.गुजराथी,व परिवारातील सदस्य तसेच व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. योगेश तोरवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *