लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
![]()

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !!! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पप्पू लोंढे या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक संदीप पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर प्रसंगी उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनपटावर आधारित प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेऊन योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास दहा रुपयाचे नाणे आणि पेन भेट म्हणून देण्यात आले .तसेच ज्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले अशा विद्यार्थ्यांनाही बक्षीस देण्यात आले. सदर प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार, शिक्षक व्ही. डी. पाटील, पी.एम. ठाकरे ,आर.डी. महाजन, ए.पी. जाधव, पी.ए.शेलकर, एम. एस .सुशीर डी .एस. माळी ,आधी शिक्षक उपस्थित होते. तसेच शिक्षिका व्हि.डी. जाधव, बी. एस. चव्हाण, एस. एस. ते, पी .पी. पाटील, सी.डी. निकम, आणि ए.यू. महाजन उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमानंतर चॉकलेट वाटप करण्यात आले. तसेच डी. ए. सोनवणे यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना कथन केला. सदर कार्यक्रमाचे आयोजनासाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैदाने यांनी परिश्रम घेतले.

