साने गुरुजी कन्या हायस्कूल शाळेत महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी एकत्र साजरी
![]()

साने गुरुजी कन्या हायस्कूल शाळेत महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी एकत्र साजरी
दिनांक 01/08/23 रोजी साने गुरुजी कन्या शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम ह्या होत्या व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा प्रतिष्ठानचे वक्ते माननीय श्री शरद पाटील हे होते त्यांनी टिळकांच्या व अण्णाभाऊंच्या कार्याचा उल्लेख केला व जयंती व पुण्यतिथी का साजरी करतो याचे महत्त्व सांगितले . अण्णाभाऊंच्या साहित्याचा परिचय दिला प्रमुख वक्ते पाटील यांनी अण्णा भाऊंचा पूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला कार्यक्रम प्रसंगी साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील सर यांनी आपले मौलिक विचार मांडून दोन्ही महान नेत्यांचा परिचय करून दिला अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय बोरसे मॅडम यांनी पीडितांसाठी आवाज उठवणारे अण्णाभाऊ साठे कायम लक्षात राहतील आपण सुद्धा त्यांचे कार्य कायम स्मरणात ठेवावे .कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननिय आबा श्री हेमकांत पाटील सचिव दादासाहेब संदीप घोरपडे व शालेय समितीचे अध्यक्ष एडवोकेट बाविस्कर उपस्थित होते .संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी श्री विलास चौधरी सर व ज्येष्ठ शिक्षक श्री जगन्नाथ पाटील व्यासपीठावर उपस्थित होते .सूत्रसंचलन श्रीमती उंबरकर मॅडम व आभार सौ विद्या पाटील मॅडम यांनी केले .

