1 min read

विकृत मनोहर भिडे यांच्या बेताल वक्तव्याने महापुरुषांची बदनामी प्रकरणी नंदुरबारला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन

Loading

विकृत मनोहर भिडे यांच्या बेताल वक्तव्याने महापुरुषांची बदनामी प्रकरणी अखिल भारतीय महात्मा ज्योतिराव फुले समता परिषद, समस्त माळी समाज नंदुरबार, महात्मा फुले फाउंडेशन नंदुरबार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले युवा मंच यांच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी श्रीमती थुबे मॅडम यांना, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या कार्यालयात निवेदन देऊन मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष एकच राजेंद्र भाऊ वाघ नंदुरबार माळी समाजाचे अध्यक्ष श्री आनंद भाऊ माळी महात्मा फुले फाउंडेशनचे आर्किटेक नरेंद्र जाधव प्राध्यापक वासुदेव माळी श्रीयुत पितांबर भाऊ खैरनार श्री भटू महाले सर श्री मधुकर माळी, शिवसेनेचे महानगर प्रमुख समिती विजय यादव माळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्रीं बापू पांडुरंग माळी श्री गुलाब माळी अखिल भारतीय महात्मा फुले युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ईश्वर भाऊ माळी, इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *