1 min read

वर्ल्ड पार्लमेंटच्या शैक्षणिक सुधार योजनेशी महाराष्ट्रीतील नामवंत शिक्षण संस्था करारबद्ध

Loading

वर्ल्ड पार्लमेंटच्या शैक्षणिक सुधार योजनेशी महाराष्ट्रीतील नामवंत शिक्षण संस्था करारबद्ध

श्रीरामपूर –
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीएच्या)
अर्थ कॉन्स्टीट्यूशन इन्स्टीट्यूट (ईसीआय) या ब्रँचच्या जागतिक पातळीवरील शैक्षणिक सुधार शिक्षणा संदर्भातील उदार वादी धोरणाचा प्रभाव जगभरातील शिक्षण संस्थांवर मोठया प्रमाणात होत असताना भारतातील खास करून महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्था प्रभावित होत असून ईसीआयशी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडींग बाँड ( एमओयु ) करत आहेत.
एमओयु करारामुळे संबंधीत महाविद्यालयांना आपल्या शैक्षणिक धोरणात सुधारणा करण्यात मोठी संधी मिळणार असून ईसीआयच्या वतीने वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, तसेच आपले अनुभवी शिक्षण तज्ञ सदर महाविद्यालयात पाठविले जातील. त्याच बरोबर गरजेनुसार संबंधीत महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना अभ्यास दौरे करण्याची संधी मिळणार आहे.
वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट प्रा. नरसिंहा मूर्ती, महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी तर संबधीत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी करारनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी डब्ल्यूसीपीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. नरसिंहा मुर्ती व महाराष्ट्र चॅप्टरचे को- ऑर्डीनेटर मेजर अशोक मोहिते, ट्रेझरर चिंतामन भोसले उपस्थित होते.
डब्ल्यूसीपीएशी करारबद्ध होणाऱ्या संस्थामध्ये अशोक ग्रामिण शिक्षण संस्थेच्या ‘ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अशोकनगरचा समावेश असून महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या सुनिता गायकवाड यांनी स्वाक्षरी केली.
श्रीरामपूरच्या खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयानेही डब्ल्यूसीपीएशी करार केला. महाविद्यालयाच्या प्राचार्या संघमित्रा राजभोज यांनी करारावर स्वाक्षरी केली.
त्रिमूर्ती आर्टस, कॉमर्स
आणि सायन्स महाविद्यालय खाडे, नेवासाफाटा ता. नेवासा, जिल्हा -अहमदनगर या महाविद्यालयाच्या वतीने
प्राचार्य डॉ. चांगदेव एस. अरसुले यांनी स्वाक्षरी केली.
तर त्रिमूर्ती आर्टस, कॉमर्स
आणि सायन्स महाविद्यालय ढोरजळगांव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर यांच्या तर्फे प्राचार्य डॉ.रजनीकांत चंद्रकांत पावसे यांनी स्वाक्षरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *