‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या १०० व्या अंकाचा प्रकाशन समारंभ
![]()

‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या १०० व्या अंकाचा प्रकाशन समारंभ
(विशेष प्रतिनिधी उदय नरे)
डीपर व महाएक्झाम परीक्षेतील राज्यात अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा व संस्थांचा सन्मान तसेच साद माणुसकीची फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा. शनिवार दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.३० ते १.३० वाजेपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रोड, महात्मा फुले संग्रहालयासमोर, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वने मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथींच्या हस्ते “तुम्ही आम्ही पालक” मासिकाच्या शंभराव्या अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
डॉ. शरदराव कुंटे तर प्रमुख पाहुणे म्हणून बिव्हिजी उद्योगसमूहाचे संस्थापक नामवंत उद्योजक
मा. हणमंतराव गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची फाउंडेशनच्यावतीने कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
संस्थापक हरीश बुटले, संचालक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, संचालक डॉ. रोहिणी बुटले, संचालक साद माणुसकीची फाउंडेशन समग्र ग्रामविकासासाठी कार्यरत संस्थाचे अनेक पदाधिकारी
प्राचार्य डॉ. किरण माणगावकर, संस्थापक, सचिव प्रा. डी. के. देशमुख, कार्यकारी अध्यक्ष व्ही. जे. गुल्हाणे, कोषाध्यक्ष, डीपर कार्यकारिणीचे मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. डीपर ही NEET, JEE, MHT-CET परीक्षांचा सराव घेणारी राज्यातील अग्रगण्य संस्था आहे.

