आर्मी स्कूलमध्ये ‘शिक्षक-पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न..
![]()

आर्मी स्कूलमध्ये ‘शिक्षक-पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न..
अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे प्रथम सत्रातील ‘शिक्षक – पालक सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सभेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य पी.एम.कोळी तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पालक प्रकाश पाटील, मीराबाई मराठे, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील व जेष्ठ क्रीडा शिक्षक व्ही.जी.बोरसे होते.
सर्वप्रथम पालकांना मिलिटरीचे काही इव्हेंट्स विद्यार्थ्यांनी सर्व पालक,प्राचार्य,कमांडंट व शिक्षकांच्या उपस्थितीत करून दाखवले.ज्यात पुषप्स,पुलप्स,फ्रंट रोलिंग, रिज डाऊन, हैंगिंग,स्विंगिंग वॉक, बरमा रोप,फायरिंग इत्यादीचा समावेश होता.हे इव्हेंट्स पाहतांना पालकांनी ही फायरिंग करण्याचा आनंद घेतला.त्यात महिला पालकांचाही समावेश होता.
त्यानंतर परेड ग्राउंड वर पालकांना विद्यार्थ्यांनी पथसंचलनाद्वारे मानवंदना दिली.त्यात विद्यार्थ्यांच्या तीन तुकड्यांचा समावेश होता.स्पोर्ट ड्रेसची रायफल तुकडी जिचं नेतृत्व मयूर हटकर या बारावीच्या विद्यार्थ्याने केले.ब्लॅक ड्रेसच्या तुकडीचे नेतृत्व नववीचा राज खैरनार या विद्यार्थ्याने केलं.तर कमबॅट ड्रेसच्या तुकडीचे नेतृत्व हर्षवर्धन पाटील या बारावीच्या विद्यार्थ्याने होते.अतिशय शिस्तबद्ध रीत्या केलेल्या पथसंंचालनामुळे पालकांना विशेष आनंद होत होता.
त्यानंतर शालेय इमारतीमध्ये पालकांचं स्वागत करण्यात आले.व मुख्य हॉलमध्ये सहविचार सभा झाली.सभेची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते झाली.या सहविचार सभेचे प्रास्ताविक सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी केले.त्यानंतर इयत्ता सहावी,सातवी आणि आठवीच्या वर्गातील पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. सभेदरम्यान आर्मी स्कूलच्या काही विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ज्यात इयत्ता आठवी अ चा विद्यार्थी महेश किरण पाटील याला ‘बेस्ट ड्रिल’ केल्याबद्दल, नेहान दीपक माळी इयत्ता सातवी अ चा विद्यार्थी ‘बेस्ट डिसिप्लिन’ बद्दल,प्रवीण राजेंद्र शिंदे सातवी ब चा विद्यार्थी ‘बेस्ट फायरिंग’ बद्दल तर ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून इयत्ता सातवी अ चा विद्यार्थी सम्राट मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर गणित विषयाबद्दल ज्येष्ठ शिक्षक बी.डी.पाटील, विज्ञान विषयाबद्दल संजय पाटील, इंग्रजी विषयाबद्दल शरद पाटील व मिल्ट्री ट्रेनिंग बद्दल नायब सुभेदार भटू पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.काही पालकांनी देखील पालक प्रतिनिधी म्हणून मनोगते व्यक्त केली.त्यात त्यांच्या पाल्यांमध्ये सुधारणा पाहून व शाळेची शिस्त पाहून त्यांनी कौतुक केले.त्यानंतर पालकांनी काही सूचना व प्रश्न विचारले. त्याची नोंद इंग्रजी शिक्षक संतोष पवार यांनी घेतली. शेवटी अध्यक्षीय भाषणात शाळेचे प्राचार्य पी.एम. कोळी यांनी पालकांच्या सूचना व प्रश्नांचे निरसन केले.त्याचबरोबर पालकांनी शिक्षकांना व शालेय प्रशासनाला सहकार्य केले तर विद्यार्थ्यांची चांगली प्रगती होऊ शकते. याबद्दलही पालकांना आवाहन केले.
या सभेचे सूत्रसंचालन व नियोजन शालेय सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शरद पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग सदस्य व्ही.डी. पाटील यांनी केले.या सभेच्याठी यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

