महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची राज्यस्तरीय सभा पुणे जिल्ह्यातील दौण्ड येथे संपन्न :-
![]()



महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची राज्यस्तरीय सभा पुणे जिल्ह्यातील दौण्ड येथे संपन्न :-
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची राज्य कार्यकारिणी, सर्व जिल्हा अध्यक्ष व सचिव तसेच सर्व युवा जिल्हा अध्यक्ष व सचिव यांची सभा आज पुणे जिल्ह्यातील दौंड येथे महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर (अहमदनगर) यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य क्रीडा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा विश्वनाथ पाटोळे (पुणे), सचिव ज्ञानेश काळे (सातारा), राज्य क्रीडाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ आनंद पवार (धुळे), राज्य क्रीडाशिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव (जळगाव), राज्य युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ मयुर ठाकरे (नंदुरबार), महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य निलेश जगताप, नाशिक विभागीय क्रीडाशिक्षक महासंघाचे प्रशांत कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सभेचे प्रास्ताविक व क्रीडाशिक्षक व क्रीडाक्षेत्रासमोरील समस्या, शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन, क्रीडाक्षेत्राची दशा व दिशा, भविष्यातील आव्हाणे यावर राजेश जाधव यांनी माहिती दिली. सभेस राजेंद्र कोतकर, विश्वनाथ पाटोळे, बी.डी. जाधव (नांदेड), आनंद पवार, निलेश जगताप यांनी मार्गदर्शन केले शालार्थ मध्ये क्रीडाशिक्षक पदाचा समावेश, शालेय क्रीडा स्पर्धेत खेळाडू प्रवेश फी रद्द करणे, जिल्हा, विभाग शालेय स्पर्धा आयोजन अनुदान, क्रीडाशिक्षकांचे अधिवेशन आयोजन, क्रीडाशिक्षकांचा कार्यभार व शारिरीक शिक्षणाच्या तासिका क्रीडाशिक्षकांनाच देणे, आश्रमशाळेत क्रीडाशिक्षक नियुक्ती, शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात विविध खेळाचे मार्गदर्शन शिबिर आयोजन करणे, तृतीय राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार आयोजन, शाळा तिथे क्रीडाशिक्षक नियुक्ती, क्रीडाशिक्षक यांच्या रिक्त जागेवर नवीन क्रीडाशिक्षक नियुक्ती याविषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले व याबाबत शालेय शिक्षण मंत्री व शालेय क्रीडा व युवक सेवा मंत्री यांचेसोबत महासंघाच्या पदाधिकारी यांची लवकरच सभेचे आयोजन करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सभेस जळगाव जिल्ह्यातून जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, निलेश पाटील, जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे प्रा समीर घोडेस्वार, गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. सन २०२३-२०२६ साठी नूतन राज्य कार्यकारिणी निवडीचे अधिकार सर्वानुमते राज्य अध्यक्ष व सचिव यांना देण्यात आले. वंदे मातरम ने सभेची सांगता झाली.

