मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी व डॉ.दिनेशभाई ठक्कर यांची स्तुत्य जनसेवा. मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात अडकलेल्या प्रवाशी बांधवांना आणि पाणी साचलेल्या भागात जेवण आणि पाणी वाटप.
![]()


मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे डॉ. मनिलाल शिंपी व डॉ.दिनेशभाई ठक्कर यांची स्तुत्य जनसेवा. मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात अडकलेल्या प्रवाशी बांधवांना आणि पाणी साचलेल्या भागात जेवण आणि पाणी वाटप.
ठाणे, कल्याण (प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,डॉ. मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने व स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ . दिनेश भाई ठक्कर, हे कल्याण स्टेशनवर जोरदार पावसामुळे अडकलेल्या प्रवाशी बांधवांना,आणि शहरातील अनेक भागात पाणी भरले आहे अश्या ठिकाणी मसाले भात आणि पाणी बॉटल वाटप करण्यात येत आहे.गेल्या आठ दहा दिवसापासून संपूर्ण मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.शहराचा सखल भागातील घरांमध्ये पाणी भरत आहे. पावसामुळे लोकल ट्रेनची अवस्था बिकट झाली. बऱ्याच लांब पल्ल्याचा गाड्या रद्द झाल्यामुळे स्टेशनवर आणि परिसरात मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,डॉ. मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने व स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ . दिनेश भाई ठक्कर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,समाजसेवक उद्योजक डॉ रामचंद्र देसले, पोलीस पाटील संघटना भिवंडी तालुका अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाऊन चे कार्यकर्ते डॉ. किशोर अढळकर यांचा विशेष सहकार्याने कल्याण, विट्ठलवाडी, , शहाड स्टेशनवर जोरदार पावसामुळे अडकलेल्या प्रवाशी बांधवांना आणि पावसामुळे काम बंद असल्यामुळे रोजगार बंद असलेले मजूर यांना मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी ,आणि स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे डॉ दिनेशभाई ठक्कर या जोडीने ,जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन,अश्या गरजू लोकांना चार,पाच दिवसापासून पाचशे/सातशे लोकांना मसाले भात आणि पाणी बॉटल वाटप करीत आहेत .त्यांचे हे सेवाकार्य पाहून संपूर्ण कल्याण डोंबिवली,शहाड परिसरातून कौतुक करत मानव सेवा ग्रुपमध्ये सेवा करण्यासाठी स्वतः हून सहभाग नोंदवित आहेत. महानगर पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासना कडून देखील मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले जात आहे, सर्वत्र मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे अभिनंदन केले जात आहे.

