1 min read

सम्राट अशोक शाळेने विद्यार्थ्यांची भरवली शाळा आपापल्या घरी.

Loading

सम्राट अशोक शाळेने विद्यार्थ्यांची भरवली शाळा आपापल्या घरी.

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी )- नैसर्गिक आपत्ती हा जीवनाचा एक भाग आहे.प्रसंगी मार्ग शोधत पुढे जायचं असतं शासनाने अतिवृष्टीची दखल घेत शाळांना सुट्टी जाहीर केली परंतु पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मात्र शाळेच्या वेळात शाळेच्या गणवेशावर घरीच अभ्यास केला.प्रथम घटक चाचणी परीक्षा जवळ आली. सलग तीन दिवस शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शैक्षणिक गुणवत्ता टिकून रहावी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या घरी सुरक्षित राहून अभ्यास करावा या उद्देशाने मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळात शालेय गणवेशात शाळेच्या वेळा पत्रकाप्रमाणे घरीच अभ्यास केला .शिक्षकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अभ्यास दिला.शाळेच्या वेळात शालेय गणवेशावर आपली मुले अभ्यास करत आहेत हे पाहून पालकांनाही समाधान वाटले तसेच शाळेचे विशेष कौतुक करत म्हणाले यापुढेही अचानक सुट्टी मिळाली तर असंच शाळेने नियोजन करावे.असे मुख्याध्यापक डॉ.गुलाबराव पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *