1 min read

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनो, आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा : भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचे आवाहन!

Loading

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनो, आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा : भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचे आवाहन!

धुळे भाजपा ओबीसी मोर्चातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार!

(प्रा.भगवान जगदाळे : मराठी लाईव्ह न्यूज)
धुळे प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा धुळे ग्रामीणतर्फे भाजपा ओबीसी मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष संजय गाते, धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व नवनिर्वाचित धुळे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचा राम पॅलेस येथे जंगी सत्कार झाला. खासदार डॉ.सुभाष भामरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, माजी महापौर तथा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज दळवी, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोज ब्राह्मणकर, ओबीसी मोर्चा व युवा संपर्कप्रमुख मच्छिंद्र सानप, प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, प्रभारी अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे सरचिटणीस किशोर संघवी, अरुण धोबी, ओबीसी मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आर.के.माळी, जिल्हा सरचिटणीस संजय खैरनार, युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष दिनेश बागुल, युवा अध्यक्ष विकी परदेशी, डॉ.दिनेश माळी, संजय अनासपुरे, सतीश गुजर, युवा जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, नानाभाऊ खैरनार, साक्री तालुकाध्यक्ष महेंद्र देसले, तालुका सरचिटणीस भय्या गुरव, प्रा.भगवान जगदाळे, संजय गोसावी, समाधान पाटील, धाकुशेठ बडगुजर, निखिल परदेशी, राजेंद्र जाधव, मोहनसिंग परदेशी, सुरेश जाधव, कपिल परदेशी, शांताराम भदाणे, रवींद्र भदाणे आदींसह ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसी मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी मनोगत व्यक्त केले. केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीकास्त्र सोडले व भाजप सरकारचे तथा पंतप्रधान मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक केले. आतापासूनच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. नूतन जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनीही आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे तोंड भरून विशेष कौतुक केले. अनुप अग्रवाल, गजेंद्र अंपळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. दिनेश बागुल यांनी प्रास्तविक केले. हिरामण गवळी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष आर.के.माळी यांनी आभार मानले. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेतील मयतांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *