1 min read

शाळांना मुंबईत सुट्टी असल्याचे
फेक मेसेज समाज माध्यमांवर वायरल

Loading

शाळांना मुंबईत सुट्टी असल्याचे
फेक मेसेज समाज माध्यमांवर वायरल

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई प्राथमिक श्री. राजेश कंकाल यांच्या नावाने आज 28 जुलै रोजी मुंबईतील शाळा बंद असल्याचा फेक मेसेज समाज माध्यमांवर वायरल झाला आहे. शिक्षण विभागाने 27 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर केली होती याच परीपत्रकात फेरफार करून नवीन परीपत्रक असल्याचे भासवण्यात आले या मुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शिक्षण अधिकारी राजेश कंकाल यांच्याशी आमच्या विषेश प्रतिनिधींनी साधला असता अशा प्रकारचे 28 जुलै सुट्टी संदर्भात कोणत्याही प्रकारचे परीपत्रक काढले नसल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारच्या खोटे मेसेजेस समाजमाध्यमावर पसरवरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण क्षैत्रात केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *