1 min read

कळमसरे माळी समाजाच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाजन

Loading

कळमसरे येथे माळी समाजाच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कळमसरे श्रीराम मंदिरात माळी समाजाची सहविचार बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते अशोक हिलाल चौधरी होते. प्रमुख अतिथी माजी सरपंच मुरलीधर राजाराम महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर तुळशीराम चौधरी होते.
यावेळेस माळी समाजाची नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली त्यात माळी समाजाच्या तालुका अध्यक्षपदी हेमंत काशिनाथ चौधरी तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कळमसरे येथील माळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली कळमसरे ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवडून आलेले सदस्य म्हणून आमच्या आजी रेश्माबाई काशिनाथ चौधरी यांचे लहान चिरंजीव हेमंत काशिनाथ चौधरी यांची माळी समाजाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली समाजातील कोणत्याही कामात त्यांच्या सिंहाच्या वाटा असतो, पुण्यतिथी असो की कोणतेही सुख दुःखाचे कारण असेल तिथे यांची हजेरी राहतेच ..तसेच नेरकर परिवारातील स्वर्गवासी आबासाहेब जगन्नाथ ओंकार महाजन माजी सरपंच यांचे लहान चिरंजीव ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन यांची माळी समाजाचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. हे सुद्धा समाजासाठी कोणाच्या लग्नकार्य असेल कुणाचे दुःखाच्या कार्यक्रमात नेहमीच सुख दुःखात समाजासाठी उभे राहतात तसेच माळी समाजातील कैलासवासी आप्पासाहेब रामदास दौलत चौधरी यांनी सुद्धा एक समाजाच्या त्याकाळी ते सचिव म्हणून काम पाहत होते. आमच्या आप्पासाहेब गेल्यानंतर आमचे विकास सोसायटीचे माजी चेअरमन नथू रामदास चौधरी हे सुद्धा एक सचिवाचे चांगले काम करत आहेत. म्हणून त्यांची कायमस्वरूपी माळी समाजाच्या सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे तिघेजण समाजासाठी वेळ काढून काम करतात म्हणून त्यांना आज सर्व समाजातर्फे हे पद बहाल करण्यात आले त्यानिमित्त अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजातील जेष्ठ नेते व विकास सोसायटी बिनविरोध निवडून आलेले अशोक हिलाल चौधरी यांच्या हस्ते व ह भ प आबासाहेब मुरलीधर तुळशीराम चौधरी हो मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष व माळी समाजातील माजी अध्यक्ष तसेच कळमसरे ग्रामपंचायत उपसरपंच व तसेच खानदेश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसो मुरलीधर राजाराम महाजन यांच्या हस्ते व सर्वच माळी समाजातील नेते मंडळी यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ व फुलगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
माळी समाजाचे जेष्ठ नागरिक व तरुण युवा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *